वेलकम बॅक टू मन का रेडिओ... 172.0 एफएमवर "वॅका... वॅका'... अजूनही तमाम भारतीयांचे अंग "फुटबॉल फीवर'मुळे तापलेले आहे. फुटबॉल वर्ल्डकप संपला तरी बहुतांश क्रीडाप्रेमी शकिराचे गाणे "वॅका... वॅका' करत पुढील आयुष्य जगत आहेत. काही लोक यालाच "वाका वाका' म्हणतात. त्यावर कडी म्हणजे यावरचे विनोदही सगळीकडे "एसएमएसड्' झालेले आहेत. एका भारतीयाला कोणी तरी विचारले, की का रे बाबा, तू फुटबॉल वर्ल्डकप पाहायला का गेला नाहीस. त्यावर त्याचे बाणेदार उत्तर म्हणजे, "अहो, कसे जाणार. आम्ही भारतीय म्हणजे मोडेन पण वाकणार नाही. अन् ती शकिरा म्हणते... "वाका वाका'... आता असले फालतू पीजे सांगून वेळ वाया घालविण्यापेक्षा ऐकू या एक गाणे...
माझ्या शकिराचा समद्यास्नी
लागलाय लळा...
माझ्या शकिराचा समद्यास्नी
लागलाय लळा...
शकिराचा महिमा काय वर्णावा... फुटबॉल वर्ल्डकपमधील तिचे गाणे अन् नृत्य पाहून भारतीयांना अलौकिकत्वाचा साक्षात्कार झाला आहे. कशावरून काय म्हणता "श... श... शकिरा' असे फ्रीजमधून आवाज काढल्यासारखा बोलणारा शाहरुख तिला सहकुटुंब भेटला तेव्हाच आम्हाला याची कल्पना आली. शकिराची स्तुती करताना तो थकत नाहीय. पुढे कदाचित "बॉलिवूड' चित्रपटांमध्ये शकिरा दिसेल यात श...श...शंकाच नाही. त्या चित्रपटांची नावे कदाचित "दिलवाले शकिरा ले जाएंगे', "शकिरा है आप की कौन', "शकिरा- द किलर', "शकिरा की राजनीती', "आय लव्ह शकिरा स्टोरीज्' इ. इ. असू शकतील. आता कॅटरिनासारखी अमेरिकेत आयुष्य गेलेली नटी बॉलिवूडमध्ये जम बसवू शकते तर शकिरा का नाही? नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार "शकिरा शक्कर' नावाने साखरेचा एक नवा ब्रॅण्ड बाजारात येणार असून त्यासाठी उत्पादकाने शकिरालाच "ब्रॅंड अँबेसेडर' म्हणून नियुक्त केले आहे तेही फक्त 2000 कोटी डॉलर्सचा करार करून! आता या वृत्ताला कोणीही दुजोरा दिलेला नसून कोणीही जबाबदारी स्वीकारलेली नाही... आणखी एक पीजे... एकूणच आपले आयुष्य एक पीजे झाले असून मूळ आयुष्यापेक्षा पीजेच खरे असे वाटण्यासारखी परिस्थिती आहे. असो...
सुन के तेरी पुकार,
कोई चलने को
हो ना हो तय्यार...
चल चला चल
"शकिरा' चल चला चल...!
(औरंगाबाद "सकाळ'मध्ये प्रसिद्धी तारीख ः 18 जुलै, 2010,)
Win Exciting and Cool Prizes Everyday @ www.2vin.com, Everyone can win by answering simple questions. Earn points for referring your friends and exchange your points for cool gifts.
ReplyDelete