बहेनो और भाईयों...आप पढ रहे हैं "मन का रेडिओ' 172.0 एफएम. आता वाचा सर्वात प्रथम ब्रेकिंग न्यूज! देशभरात पेट्रोल-डिझेल-गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्यांत असंतोषाची लाट निर्माण झाली असून ठिकठिकाणी त्याचे पडसाद उमटत आहेत. तरुण वर्गाला आपल्या पालकांकडून मिळणाऱ्या अत्यल्प "पेट्रोल भत्त्या'वर सर्वाधिक ताण पडला असून त्यांच्याकडून हा भत्ता तत्काळ वाढविण्याची मागणी होत आहे. त्याशिवाय तरुणांना शहराच्या परिसरातील "देवदर्शन', निसर्गदर्शन करणे, "अभ्यास' सहलींना जाणे शक्य नाही, अशी भावना व्यक्त होत आहे. वेतन आयोगामुळे पगार फुगलेल्या कुटुंबांमध्येही या दरवढीमुळे संतोष संपून असंतोष पसरला असून चिंता वाढीस लागली आहे (एरव्हीही ते कधीच संतुष्ट नसतात म्हणा, पाचवा दिला की, सहाव्याचे काय? सहावा दिला की एरियर्सचे काय?), कमी पगार असणाऱ्या पतीदेवांची खरडपट्टी काढण्यात येत आहे आणि "तुम्हीच सांभाळा हे घर, मी चालले माहेरी' अशा धमक्या मिळत आहेत. या सर्व बातम्या ब्रेकिंग न्यूज नव्हत्या, तर या पार्श्वभूमीवर आमचे एक वाचक भ्रमर ढिल्ले यांनी "पेट्रोललेस वर्ल्ड' हा नवा शोध लावला असून तो खास "मन का रेडिओ' च्या वाचकांपुढेच ठेवण्याचा चंग त्यांनी बांधला आहे, ही खरी ब्रेकिंग न्यूज आहे. ही नवीन संकल्पना, शोध काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न आमची बातमीदार बंडू भांडाफोडकर यांनी अनेक वेळा केला, पण भ्रमर ढिल्ले यांनी थेट "मन का रेडिओ'वरच मन मोकळे करण्याचा हट्ट धरल्यामुळे त्यांना येथे आणण्यात आले आहे. आता वाचा त्यांनीच डिक्लेअर केलेला हा शोध...
भ्रमर ढिल्ले ः पेट्रोल भरो, जल्दी करो, मेरी गाडी कबसे खडी हैं... असे म्हणण्याची आता काहीही गरज नाही. "मन का रेडिओ'च्या वाचकांना माझा सलाम. ते फारच भाग्यवान आहेत की, त्यांना माझे संशोधन फर्स्ट टाईममध्ये थेट येथेच वाचायला मिळणार आहे. मागे एकदा रामर पिल्ले नामक मानवाने पेट्रोल तयार करण्याचा दावा केला होता. पुढे त्याचे काय झाले ते सर्वांनाच माहीत आहे. पण माझे नाव "भ्रमर ढिल्ले' आहे. माझे संशोधन शंभर टक्के सक्सेसफुल आहे. "पेट्रोललेस वर्ल्ड' ही संकल्पना प्रत्यक्षात आली नाही, तर माझे नाव बदलून टाका! तर काय की, या पेट्रोल-डिझेल-गॅस दरवाढीमुळे आपल्या नाकात दम आणला आहे. पब्लिक फार परेशान आहे. पब्लिक करीत काही नाही, दोन-चार दिवस बोंब मारती. नंतर गुमान गाडी ढकलीत पेट्रोलपंपाला लागती, पण पब्लिक फार परेशान झाली आहे. हे लक्षात घेऊन पेट्रोलची गरजच पडू नये यासाठी काय करता येईल, याचा मी विचार केला. खूप डोका खाजवला. तेव्हा कोठे उपाय सापडला. आता जगातील कोणत्याही समस्येवर दोनच उपाय आहेत... एक म्हणजे कॉम्प्युटर आणि दुसरा म्हणजे मोबाईल! आता आपल्याला एक वेळ खायला-प्यायला नसले तरी चालेल पण या दोन गोष्टी आवश्यकच आहेत. तर या दोन गोष्टींचा वापर मी "पेट्रोललेस वर्ल्ड' निर्माण करण्यासाठी करणार आहे. माणसाला पेट्रोल कशाला पाहिजे. गाडीसाठी. गाडी कशाला पाहिजे वाहतुकीसाठी, एकडून तिकडे जाण्यासाठी. मग या प्रचलित पद्धतीपेक्षा मानवाला, वस्तूंना इकडून-तिकडे जाता आले, नेता आले तर? हेच मी डोके लावले. आता पेटली का तुमच्या डोक्यात ट्यूब? न्यूटनच्या अंगावर सफरचंद पडले आणि गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. माझ्याबाबतीत तसेच झाले. मी एक पीडी.एफ फाईल तयार करून ती एका ई-मेलला अटॅच करून मित्राला पाठिविली आणि तेथेच माझ्या "पेट्रोललेस वर्ल्ड' संशोधनाची मुहूर्तमेढ रोवल्या गेली. माझे मुख्य संशोधन हेच की, जशी फाईल पी.डी.एफ. करून इकडे-तिकडे ई-मेलद्वारे पाठवितात, तसेच माणसं, वस्तू पाठविता येतील. मी एक विशिष्ट स्कॅनर तयार करीत असून त्यातून माणूस, वस्तू गेली की तिची "पीडीएफ' फाईल तयार होईल. ती ई-मेलला अटॅच केली की, जगात कोठेही पाठविता येईल! फक्त डाऊनलोड करायचे की झाले काम फत्ते! नो पेट्रोल, नो पेट्रोल दरवाढ, नो महागाई, ओन्ली पेट्रोललेस वर्ल्ड!
बंडू भांडाफोडकर ः आत्ताच तुम्ही "स्कॅनर तयारी करीत आहे', "जगात कोठेही पाठविता येईल' अशी भविष्यकालीन वाक्ये उच्चारलीत. म्हणजे तुमचे संशोधन पूर्ण झालेले दिसत नाही.
भ्रमर ढिल्ले ः फारच लवकर, काही दिवसांतच म्हणाना. हे काम होऊन जाईल.
बंडू ः परत एकदा भविष्यकालीन वाक्ये! उठा उठा येथून... नाही तर तुम्हालाच "पीडीएफ' करतो येथून...
बहेनो और भाईयों... "पेट्रोललेस वर्ल्ड'ची भाकडकथा सादर करणाऱ्या या भ्रमर ढिल्लेचे नाव खरेच बदलावे लागेल. पण नको! आहे तेच नाव काय कमी भंकस आहे?
("सकाळ'मध्ये प्रसिद्धी तारीख ः 27 जून, 2010)
Sunday, June 27, 2010
Sunday, June 20, 2010
दहावी बोर्ड प्रसन्न शिक्षण खाते प्रसन्न...
वेलकम बॅक टू मन का रेडिओ... 172.0 एफएमवर आपले स्वागत आहे. त्याचं काय आहे की, नुकतेच लागलेत दहावीचे निकाल... तमाम विद्यार्थी मंडळींवर यंदा दहावी बोर्ड प्रसन्न झाले आहे. त्याआधी अख्खे शिक्षण खातेच प्रसन्न होऊन त्याने आठवीपर्यंतच्या मुलांचे कोटी कोटी कल्याण अर्थात "ऑल इज वेल' करून टाकले. म्हणजेच आठवीपर्यंत सर्वांना आधीच पास करून टाकले! यंदा तर दहावीच्या विद्यार्थ्यांना किती मार्क पडावेत याला काही घरबंध राहिला नाही. चक्क शंभर टक्के मार्क घेणारे किती तरी विद्यार्थी निघालेत! मग 97 टक्के मार्क घेणारा विद्यार्थी रडत बसलेला आढळला तर नवल नाही. आता शिक्षण खात्याच्या दररोजच्या नवनव्या धोरणांमुळे घरोघरी, ठिकठिकाणी नवनवे प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. तर आजच्या एपिसोडमध्ये वाचा अशाच काही घरघरच्या, ठिकाण ठिकाणच्या कहाण्या...
घर नं. 1 ः मुलगा रुसून बसला आहे. आई-वडील त्याची धमकीवजा समजूत घालताहेत...
आई ः काय म्हणतोस ट्यूशनला जाणार नाहीस?
मुलगा ः आता कोणीच नापास होणार नाहीये... मला सांगितलंय शेजारच्या टॉमीने... मग ट्यूशनला कशाला जायचे? उगाच मला टेंशन देऊ नका. आतापर्यंत खूप छळले. सारखे आपले सकाळ, संध्याकाळ ट्यूशन, ट्यूशन.. आता ऐकणार नाही म्हणजे नाही.
बाबा ः अरे बाबा, पण आपली इतकी वर्षांची ट्यूशनची सवय कशी सुटेल. तू दुसरीला असल्यापासून तुला ट्यूशनला पाठविले. आमची हौसमौज केली नाही, पण तुला विविध ट्यूशन्स लावल्या, कशासाठी तुझ्या भल्यासाठीच ना!
आई ः ...आणि शेजारचा टॉमी त्या फेमस ट्यूशनला जातो त्याचे काय? तू ट्यूशन सोडली तर सगळे शेजारी-पाजारी, नातेवाईकांसमोर काय इज्जत राहील आमची. ते काही नाही, तू ट्यूशनला गेलाच पाहिजेस. तेवढाच चार तास आडकून पडतोस, नाही तर घरभर धिंगाणा...
घर नं. 2 (आई घरात चिंताग्रस्त बसलीय. पप्पा घामाघूम होऊन घरात प्रवेश करतात) ः
आई ः काही कळलं का?
पप्पा ः कळलं, कळलं. आंदरकी बात कळलीय. पार शिक्षण खात्यात आतपर्यंत लग्गा लावून माहिती मिळविलीय. कोणाला सांगू नकोस. फार कॉन्फिडेंशियल आहे. अगं, आठवीपर्यंतचे सर्व मुलं पास होणार, त्यांना ग्रेड मिळणार असं सांगितलंय, पण आंदरकी बात म्हणजे परीक्षा होणार, शाळा मुलांना मार्क देणार, प्रश्नपत्रिका पालकांना दाखविणार... फक्त मार्कशीटवर "ए', "बी', "सी', "डी' ग्रेड देणार.
आई ः यात काय आलं डोमल्याचं कॉन्फिडेंशियल. सगळ्या जगाला माहीत आहे ते!
एक शाळा (शिक्षक गप्पा मारत बसलेले) ः एक शिक्षक दुसऱ्याकडून गुटखा घेऊन तोंडात एका बाजूला व्यवस्थित सेटअप करून चर्चेला सुरुवात करतो...
शिक्षक नं.1 ः आरे बाबा आता हे नवीनच आलंय. म्हणे पोरांना नापासच करायचे नाही. त्यांचा कल पाहायचा. त्यांना विषय कळला की नाही, त्यावर भर द्यायचा.
शिक्षक नं. 2 ः आधी आपलं बरं होतं बाबा. पेपर काढायचा, पेपर तपासायचा. पास-नापास केले, की झंझट खतम.
शिक्षक नं. 3 ः माहितीय माहितीय किती प्रामाणिकपणे पेपर तपासत होतोत आपण... पुढंही तोच प्रामाणिकपणा कायम राहील...(एकमेकांना टाळी देतात).
असो. एकूणच या "ऑल इज वेल' धोरणामुळे झालेय काय की, विद्यार्थी पार मोकाट सुटलेत! आपल्या आई-वडिलांना जुमानेसे झालेत. पालक परेशान झालेत. काही शिक्षक नेहमीप्रमाणेच "प्रामाणिक' राहणार आहेत. खरोखरचे प्रामाणिक शिक्षक कोणत्याही सिस्टिममध्ये विद्यार्थी घडविण्याचे काम करणारच आहेत. काय म्हणता, विद्यार्थी बिचारे आता मोकळा श्वास घ्यायलेत, लगेच तुमची किरकिर झाली का सुरू? तुमचंही बरोबर आहे. ओके... येथेच संपवूया आपली ही "घर घरची कहाणी...'
("सकाळ'मध्ये प्रसिद्धी तारीख ः 20 जून, 2010)

Sunday, June 13, 2010
"गोल'गप्पे..!
वेलकम बॅक टू "मन का रेडिओ'... 172.0 एफएमवर आपले "गोल'गप्पे (काही लोक "गोलगप्पे'ला गुपचूप-गुपचूप, पाणीपुरी असेही म्हणतात, पण येथे याचा अर्थ फुटबॉलशी संबंधित आहे) मारण्यासाठी स्वागत. त्याचं काय आहे की, फुटबॉलचा वर्ल्डकप सुरू झाल्यापासून आपल्याकडे वातावरण कसे पार फुलबॉलमय झाले आहे. त्यामुळेच तर फुटबॉलची चर्चा म्हणजेच "गोल'गप्पे मारण्यासाठी आम्ही आतूर झालो आहोत. पावसाळ्यात जसे अचानक बेडकांची उत्पत्ती होऊन त्यांचा "डराव डराव' आवाज येऊ लागतो, तसेच फुटबॉलचा वर्ल्डकप सुरू झाला की, आपल्यालाही फुटबॉल हा जागतिक नंबर वन खेळ असल्याचा साक्षात्कार होऊन तोंडून "गोल गोल' असे चित्कार बाहेर पडू लागतात. तसा तर आमचा आणि फुटबॉलचा संबंध "मिस्टर इंडिया' या जुन्या चित्रपटातील "दे दे...दे दे सायबा, फुटबॉल वापस मुझे' या पॅरोडी गाण्यापासूनच आला होता. ते गाणे ऐकल्यानंतर आम्ही सातत्याने फुटबॉलवर संशोधन करीत राहिलो. पुढे पुढे "मॅराडोनाने किती "रन' काढले' किंवा सचिन तेंडुलकरने किती "गोल' केले, अशा चौकशा करेपर्यंत आमचे ज्ञान वाढत वाढत गेले. पेले, मॅराडोना, डुंगा, झिनेदिन झिदान, रोनाल्डो, रोनाल्डिनो अशी नावे नंतर आमच्या जिभेवर सहज विराजमान झाली. "ब्राझील... ब्राझील...' या वेंगाबॉईजच्या गाण्याने भारतीयांना लग्नसराईत नाचताना किती साथ दिली हे वेगळे सांगायला नको. याकडेही आम्ही लक्ष ठेवून होतो. यंदाचा फुटबॉल वर्ल्डकप सुरू झाला आणि याबाबतीत आम्ही स्वतः भारतीयांना फुटबॉल म्हणजे काय वाटते, त्यांना कितपत समजते हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या काही संकलित प्रतिक्रिया थोडक्यात अशा -
- फुटबॉल हा खेळ कालच पाहिला. त्यावरून जगभरात किती दारिद्य्र आले याची कल्पना येते. चक्क अकरा खेळाडू एका फुटबॉलच्या मागे अख्खे नव्वद मिनिटे लागले होते, याला काय म्हणावे? काय म्हणता "पीजे पीजे'... पीजेच तर सांगायचा होता.
- मला उद्घाटनाच्या सामन्यातील काय आवडले असेल तर शकिराचा डान्स. वा क्या बात है... आता मात्र फुटबॉल संपेपर्यंत काही समजले नाही तरी सामन्यांवर लक्ष ठेवावेच लागेल. काय करणार... ऑफिसमध्ये आपण किती फुटबॉल तज्ज्ञ आहोत हे दाखवायला तेच तर कामाला येणार आहे.
- भारतीयांनी फुटबॉलच्या नादी लागू नये. आपण आपले क्रिकेट खेळलेलेच बरे. फुटबॉल आपल्या तब्येतीला मानवणारे नाही. त्यात सारखे 90 मिनिटे इकडून तिकडे आणि तिकडून इकडे पळापळ करावी लागते. नुसता घाम गाळावा लागतो. अन् एवढे करून गोल किती होतात एक ना दोन! आताच्या क्रिकेटपटूंना तरी ट्वेंटी-ट्वेंटीमुळे बरीच पळापळ करावी लागते, आधी तर कसोटीत पाच-पाच दिवस आरामशीर खेळ चालायचा. आताही फिल्डरच्या वाट्याला केव्हा तरी चेंडू येतो एवढेच. आणि "अंदरकी बात' म्हणजे यात आपले दहा-बारा संघात सहज "शेर' होता येते. फुटबॉलमध्ये शंभरावर देशांशी कोठे "डोके' (हेडर) लावायचे?
- क्रिकेटमध्येही फुटबॉलप्रमाणेच "कार्ड' दाखविण्याची पद्धत सुरू करायला हवी. अमोशा-पौर्णिमेला खेळणारा युवराज नीट नाही खेळला की, त्याला "गुलाबी' कार्ड दाखवायचे (अर्थात अंपायरने). त्यामुळे त्याला थेट क्रिकेट सोडून "बॉलिवूड'मध्ये काम करणे सक्तीचे होईल. धोनी-सचिनने विकेटा फेकल्या की त्यांना "मनी कार्ड' दाखविले जावे. त्यामुळे त्यांच्या जाहिरातीच्या पैशांतून तत्काळ कपात होईल, अशी व्यवस्था करावी इ.इ.
तर मित्रांनो, वरील संकलित प्रतिक्रिया वाचून तुमच्या फुटबॉलच्या ज्ञानात भर पडली असेल असे आम्ही मानतो. फुटबॉल जरूर पहा पण आपला मुख्य खेळ क्रिकेट आहे हे विसरू नका म्हणजे झाले!
("सकाळ'मध्ये प्रसिद्धी तारीख ः 13 जून, 2010)

Subscribe to:
Posts (Atom)