आता तुमचे "मन का रेडिओ'... 172.0 एफएमवर... कोणत्या तोंडाने स्वागत करावे, असा प्रश्न आम्हाला पडला आहे... त्यासाठी सज्जड कारणही आहे. मुख्य कारण म्हणजे तापमान. "मान ना मान, मै तेरा महेमान' असे म्हणत तापमानाने सर्वांची पार वाट लावली आहे. "मन का रेडिओ'च्या या नॉनएसी स्टुडिओत सध्या तापमान फोर्टी प्लस आहे. त्यामुळे आता येथील वातावरण कसे असेल हे सांगण्याची तशी गरज नाही, तरी आम्ही सांगणारच आहोत, हे तुम्ही ओळखलेच असेल. तर स्टुडिओतील कर्मचारी काम करताना दिसताहेत, पण ते वास्तविक डोळे उघडे ठेवून झोपी गेलेले आहेत... दुपारच्या जेवणामुळे त्यांची अशी अवस्था झाली आहे...काही जण घरीच आराम फर्मावत आहेत आणि ऊन कधी कमी होईल याची वाट पाहत आहेत... विशेष म्हणजे "झिरो लोडशेडिंग' जाहीर असले तरी सर्वांना लोडशेडिंगचा सराव कायम राहावा या उद्दात हेतूने महावितरणमध्ये मध्ये वीज गुल करते. त्याचा परिणाम म्हणून स्टुडिओतील पंखे श्रद्धांजलीसाठी जसे स्तब्ध उभे राहतात अगदी तस्से उभे आहेत... त्यामुळे स्टुडिओतील पाली, उंदरे आदी तत्सम प्राणी, त्यांना काही कळत नसल्यामुळे "जरा पंखा लावा की राव...' या मुद्रेने कर्मचाऱ्यांकडे टक लावून पाहत आहेत... तशात आमचे बातमीदार बंडू भांडाफोडकर धापा टाकतच स्टुडिओत प्रवेश करीत आहेत. त्यांना मुळीच बोलता येत नाहीय... ऊन दुसरे काय? त्यांच्या इशाऱ्यांवरूनच त्यांनी उन्हामुळे त्रस्त झालेल्या काही नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया आणल्याचे स्पष्ट झाले. त्याच प्रतिक्रिया देऊन आजचे प्रक्षेपण थांबवावे लागणार आहे. तर वाचा प्रतिक्रिया...
नागरिक नं. 1 ः कडक उन्हामुळे पाण्याची फार बोंब झालीय हो! नळाला पाणी आले की, दरदिवशी मोटारसायकल, घराच्या बाह्य भिंती नळी लावून मस्तपैकी धुऊन काढण्याचा माझा नियम होता, पण आता... नळाला पाणी येते 20 मिनिटे आणि त्यात वीज मोटार पकडणाऱ्यांची गस्त. त्यामुळे "मोटार लावा, मोटार काढा' यातच वेळ जातो.
नागरिक नं. 2 ः घरी एवढे उकडेतेय की, त्यापेक्षा ऑफिसमध्ये बरे. तेथे निदान झोपा तरी काढता येतात. एरवी आम्ही वर्षभरही तेच करीत असतो. त्यामुळे त्याचा सरावही आहे! घरी झोपच लागत नाही.
नागरिक नं. 3 ः आमच्याकडे पाच दिवसाला एकदा पाणी येते... तेही टॅंकरने. शेजारच्या गल्लीतील नागरिक आणि आमच्या गल्लीतील नागरिक असे एकदमच त्यावर हल्ला करून आम्ही त्या पाण्याचा फडशा पाडतो. अर्थात अर्धे पाणी रस्त्यावरच वाहून जाते, हा भाग वेगळा.
नागरिक नं. 4 ः महावितरणचे आभार जेवढे मानावेत तेवढे कमीच आहेत. एक तर उन्हाळ्याचे दिवस... त्यात आंब्याच्या रसावर मस्त ताव... वर थंडगार सरबत. थंडगार कूलरची हवा... काय होणार? ढेरी बघा कशी चंद्रकलेप्रमाणे वाढू लागली होती; पण महावितरणने मध्येच वीज गुल करण्याची शक्कल लढविली आणि दुपारच्या झोपेचे पार खोब्रे झाले. थोडे रागाने बोललो असे वाटले असेल तर महावितरणची मी माफी वागतो; पण त्यांनी जे काही केले ते नागरिकांच्या भल्यासाठीच ना? आज ना उद्या पुन्हा आपल्याला लोडशेडिंगशी टक्कर घ्यावीच लागणार आहे. मग विजेवाचून राहण्याचा सराव तुटायला नको. त्यासाठीच त्यांचा हा उपाय मला फार आवडला. ढेरीही लेव्हलला आली.
नागरिक नं. 5 ः आता पावसाची प्रतीक्षा आहे... कधी येईल कोण जाणे... दरवर्षी सुरुवात तर चांगली करतो, मग कोठे गायब होतो... असो. आता दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यात वृक्षारोपणाचे फॅड सुरू होईल. "एक झाड, एक फोटो, एक वर्षाने पुन्हा एक खड्डा... त्याच खड्ड्यात पुन्हा पुढच्या वर्षी वृक्षारोपण... पुन्हा पाणीटंचाई, वीजटंचाई, त्यावरून मारामाऱ्या इ...इ...
("सकाळ'मध्ये प्रसिद्धी तारीख ः 30 मे, 2010)
Sunday, May 30, 2010
Friday, May 28, 2010
चिअर गर्लचा चित्कार अन् लाईव्ह शो!
वेलकम बॅक टू मन का रेडिओ, 172.0 एफएमवर. क्या बात हैं भई, क्रिकेट का मोसम शुरू हो गया है, आयपीएलच्या मस्त मॅचेस पाहून तुमची तबियत खूश झाली असेल. पण आता एवढ्यावरच थांबण्याची गरज नाही. अहो, आता तर थेट थिएटरमध्येच आयपीएलच्या मॅचेस लाईव्ह दिसणार आहेत म्हणे! देशभरातील 1000 मल्टीप्लेक्स थिएटरमध्ये हे सामने दिसणार आहेत. पण मंडळी, आता त्यावरही समाधान मानण्याचे कारण नाही, कारण हे सामने थिएटरमध्ये जाऊन पाहताना तुमच्या कानावर "चिअर गर्ल्स'चे चित्कार ऐकू येणार आहेत! म्हणजे पडद्यासमोर असते ना त्या छोटेखानी स्टेजवर खरोखरच्या चिअर गर्ल्स अवतरणार आहेत. तशी व्यवस्थाच करण्यात आली आहे. तिकडे कोणी चौकार-षटकार मारले की, इकडे या चिअर गर्ल्स अंगात आल्यासारखे लाईव्ह नाचणार म्हणे! असो. तर या नव्या फंड्याच्या पार्श्वभूमीवर वाचूया एक गाणे...
चिअर गर्ल आली...
मुंबापुरीहून आली...
असं काय नाचता,
तसं काय नाचता...
आता हे नवे तंत्रज्ञान आल्यामुळे पुढे आपल्याला काय काय लाईव्ह करता येऊ शकेल, यावर "मन का रेडिओ'च्या एक्स्पर्ट टीमने लगोलग संशोधन करून टाकले आहे. ते असे ः
"सासू पण कधी सून होती...' लाईव्ह ः यामध्ये या सिरिअलचे थेट लाईव्ह प्रक्षेपणच करता येईल. तिकडे सासूने सुनेच्या (किंवा व्हाईस व्हर्सा, असेही होते बरे का आजकाल!) कानाखाली आवाज काढला की, इकडे स्टेजवर बसलेल्या काही बायका मोठमोठ्याने "रुदाली'सारख्या रडायला लागतील. किंवा तिकडे सिरिअलमधील बायकांचे (नागिनस्टाईलचे गंध वगैरे लावलेल्या) कटकारस्थान शिजू लागले की इकडे स्टेजवरील बायका आपापसात कुजबुजू लागतील. मध्येच "चक चक, अरेरे फार वाईट झाले' असे बॅकग्राउंड म्युझिक तयार करतील. कोण मेले, कोणाचा दुसरा अवतार सुरू झाला, कोणी मरून अचानक परतले की, त्या त्या सिच्युएशननुसार स्टेजवर आपल्याला लाईव्ह फिल देण्यासाठी जे काही करावे लागेल ते करता येईल.
लाफ्टर शो लाईव्ह ः आता असेही लाफ्टर शोचे एवढे पीक आले आहे की, थिएटरमध्ये जाऊन कोण पाहणार असे वाटेल; पण तसे नाही. त्याला "लाईव्ह'ची साथ असल्यामुळे ते फार रंगतदार होतील. तिकडे पडद्यावर कोणी लाईव्ह बाष्कळ विनोद सांगितला की, इकडे खाली बसलेले शे-दोनशे माणसं मोठमोठ्याने हसायला लागतील. आता अशी हसण्याची कॅसेट लावता आली असती; पण समोर साक्षात लाईव्ह लोक हसताहेत म्हटल्यावर पाहणाऱ्यालाही आपोआपच हास्य योग संघात आल्यासारखे वाटेल अन् त्यालाही नसलेल्या विनोदावर हसू फुटेल. यातून दोन गोष्टी साध्य होतील. मनोरंजन ते मनोरंजन होईल वर हसण्याचा व्यायाम फ्री!
दहावी-बारावी परीक्षा लाईव्ह ः आता ही एकदम ब्रॅंड न्यू कल्पना आहे. दहावी-बारावी परीक्षेचा पेपर सुरू असतानाचे जे काही प्रकार होतात ते लाईव्ह पाहणे म्हणजे एक लाईफटाईम कार्यक्रम पाहिल्याचा आभास प्रेक्षकाला होणार आहे. परीक्षा केंद्रावर आपल्या पाल्याच्या मदतीसाठी हातात कॉप्या घेऊन तत्पर असलेले पालक, पोलिस आणि कॉप्या पुरविणाऱ्यांचा पाठशिवणीचा खेळ, केंद्रावरील कर्मचारी यांचे परीक्षार्थींना सहकार्य, काही धाडसी विद्यार्थ्यांचे सुपरमॅन, जेम्स बॉंडप्रमाणे खिडक्यांतून कॉप्या पुरविणे हे सर्व लाईव्ह सुरू असताना इकडे स्टेजवरही साधारणतः तसाच गोंधळ सुरू ठेवता येईल. विशेष म्हणजे त्यात प्रेक्षकांनाही सहभागी होता येईल. तज्ज्ञ कॉपी पुरवठादारांना आपली मते "साईड बाय साईड' मांडता येईल. एकूणच "एकमेकां साह्य करू, अवघे परीक्षा पास करू' हे ब्रीद सार्थ ठरेल.
(या आयडिया "मन का रेडिओ'तर्फे सर्वांसाठी फ्री आहेत. कोणीही याचा वापर करू शकतो).
("सकाळ'मध्ये प्रसिद्धी तारीख ः 14 मार्च, 2010)

मुन्नाभाईचे मनोगत
वेलकम बॅक टू मन का रेडिओ... 172.0 एफएमवर आपले स्वागत आहे. जगातील लेटेस्ट आणि सर्वाधिक क्रांतिकारी घटना नुकतीच घडली आहे, ती सुद्धा भारतात नव्हे नव्हे महाराष्ट्रात... नव्हे मराठवाड्यात... चक्क उमरगा तालुक्यात गुंजोटी येथे! तेथील विद्यार्थ्यांनी त्यांच्याविरुद्ध होणाऱ्या "अन्याया'विरुद्ध बापूंच्या अहिंसात्मक आंदोलनाला साजेसा उपक्रम अर्थात ठिय्या देऊन आवाज उठविला. सगळीकडे सर्रास कॉप्या सुरू असताना आम्हाला कॉपी करू देत नाहीत, म्हणजे काय? असे म्हणत विद्यार्थ्यांनी चक्क परीक्षा केंद्रात जाण्यास नकार दिला. तब्बल अर्धा तास निषेध नोंदवून मग विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. असा हा जागतिक ऐतिहासिक लढा महाराष्ट्रात झाला. यावर बापूंचे भक्त मुन्नाभाईंना (एमबीबीएस) मनोगत व्यक्त करण्याचा, थेट बापूंशी संवाद साधण्याचा मोह अनावर झाला नाही, तरच नवल. आणि त्याला "मन का रेडिओ' सारखे व्यासपीठ कोठे मिळणार... तर वाचूया या विषयावर मुन्नाभाई एमबीबीएसचे मनोगत, थेट बापूंशी संवाद...ऑन एअर...
मुन्नाभाई ः प्रणाम बापू... क्या सब ठिकठाक हैं ना... मुन्नाभाई एमबीबीएस पिक्चरके बाद पहिलीच बार रेडिओ पे बोल रहा हूं. गुंजउठी (गुंजोटी) गॉंव के बच्चे लोगों नें आपके स्टाईल से आंदोलन किया. मेरा तो भेजाच नहीं चलरेला हैं. सर्किटका तो पुरा सर्किटीच डॅमेज हो गया हैं. आजकल के बच्चे लोगों को क्या हो गया... कुछ समज नहीं आता. क्या बोलते मालूम उधर कॉपी चलरेली तो इधर क्यूं नहीं. आता बापू सवाल एकदम सहीं है पर कल ये बोलेंगे वो चोरी कर रहां है, तो मैं क्यूं न करूं! आता हे बरोबर आहे का, तुमीच बोलो! अब सर्किट और मैने पिक्चरमें किया वो एकदम गलत था, सब रॉंग था. अब ये बच्चे लोंगों का सिक्रेट मेरे को मालूम. सालभर ये घूमेंगे, फिरेंगे, ऐश करेंगे और क्या! पेपर जवळ आला की, मग पुस्तक घेऊन बसणार. पुस्तकातलं भेजात घुसलं नाही तर पुस्तकाचे पोस्टमार्टेम करून कॉप्या करणार. वर कॉपी नाही करून दिली तर ठिय्या देणार. वा रे वा... मैं क्या बोलता ऐसे बच्चों को करने दो ना कॉपी. उनके सामने रख दो किताब... लेकिन स्टडीच नहीं किया तो ऍन्सर कहॉं से मिलेगा! ढूँढते रहे जाएंगे... टाईम खतम और फिर फेल! अगर कॉपी करके पास भी हुए तो "इडियटी'च रहेंगे ना. उनका तो "ऑल इज वेल' होनेवालाच नहीं. बापू... तुमीच समझाओं ना इनको. मेरा तो भेजाफ्राय होगया... सर्किट किधर हैं तू... गाडी निकाल रे बाबा...
("सकाळ'मध्ये प्रसिद्धी तारीख ः 21 मार्च, 2010)

ईश्वरजी हाजीर हो...!
वेलकम बॅक टू मन का रेडिओ... 172.0 एफएमवर! आजच्या दिवशी आजचाच "मन का रेडिओ'चा एपिसोड प्रसारित व्हावा, ही तो ईश्वराची इच्छा! आता ही काय नवीन भानगड असे अनिच्छेने पाहू नका. त्याचं काय आहे, आजचा कार्यक्रम "व्हीव्हीएस' (व्हेरी व्हेरी स्पेशल, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण नव्हे!) आहे. आज "मन का रेडिओ'मध्ये भरलीय "मन की अदालत'. यामध्ये तुमचा आवडता आरजे पद्या त्याच्या "मना'ला वाट्टेल ते प्रश्न विचारणार आहे आणि तेही थेट ईश्वराला! अरे बापरे, एवढी एक्स्कुझिव्ह बातमी एवढ्या सहजतेने आम्ही सांगितल्याबद्दल आम्हालाच आश्चर्य वाटत आहे. असो. "मन की अदालत'मध्ये आम्ही थेट ईश्वरालाच पाचारण करण्याचे कारण म्हणजे नुकतीच एका आश्रमात झालेली चेंगराचेंगरी आणि त्यासाठी जबाबदार धरण्यात आले ते थेट ईश्वरालाच! ""आश्रमातील व्यवस्था चोख होती; पण काय करणार ईश्वरच चेंगराचेंगरीला जबाबदार आहे,'' असे आश्रमाच्या प्रवक्त्याने सांगितले म्हणे! त्यामुळेच तर ईश्वर आहे असे समजून आम्ही ही अदालत बोलावली आणि तसेच कोणी तरी आलेही. त्यातून इतर काही समस्यांचाही उलगडा होऊ शकेल. तर वाचूया "मन की अदालत'... 172.0 एफएमवर...
(श्रीमानजी ईश्वरजी हाजीर हो... अशी हाळी... त्यानंतर अचानक झगमगाट होऊन, ईश्वरासारखे कोणी तरी खुर्चीवर स्थानापन्न झालेले दिसतात. त्यांच्या हातात माईक देण्याचा प्रयत्न स्पॉटबॉय करतो, पण ईश्वरजी "चुटकी' वाजवतात आणि त्यांच्या हातात आपोआप माईक येतो. पुढे...)
- ईश्वरजी आपले "मन की अदालत'मध्ये स्वागत. आपल्यावर आरोप आहे की, सदर आश्रमात झालेल्या चेंगराचेंगरीला आपणच जबाबदार आहात. आपण ही जबाबदारी घेता काय?
ईश्वर ः अरे बाबा, ही काय एखाद्या स्फोटाची जबाबदारी घेण्यासारखे सोप्पे आहे का? आपली कोणतीही संघटना उठते आणि घेते जबाबदारी! आय हॅव टू चेक ऑल इन्सिडेन्स. आमच्या रेकॉर्ड विभागाला याबाबतीत चौकशी करण्यास आम्ही सांगितले आहे. सत्यशोधन समितीही स्थापन झाली आहे. तिचा अहवाल येताच या घटनेला जो कोणी जबाबदार असेल, त्याला कडक शासन करण्यात येईल.
- असे असले तरी तुम्हाला ही जबाबदारी झटकता येणार नाही. ही घटना झालीच कशी?
ईश्वर ः त्याचं काय आहे, की आजकाल भक्तांची संख्याच एवढी वाढली आहे की, विचारू नका! त्यांच्या मागण्या, अपेक्षाही प्रचंड वाढल्या आहेत. कोणाला डॉक्टर व्हायचंय, कोणाला इंजिनिअर, कोणाला प्रेमात यश हवं आहे तर कोणाला नोकरी! (तरुण भक्तांची संख्या वाढण्याची ही दोन कारणे असावीत). आता या सर्वांची पूर्तता करावीच लागते. शेवटी "इमेज'चा प्रश्न आहे. आपल्या समस्या सोडविण्यासाठी लोकांनी कोणालाही "मध्यस्थ' न ठेवता थेट माझ्याशी कॉंटॅक्ट केला तर वरील प्रकारच्या घटना टळतील. माझा कॉंटॅक्ट नंबर मी थोड्या वेळात देतो.
- देशातच नव्हे तर जगात भ्रष्टाचार बोकाळलाय, अनीती वाढली आहे, अन्याय-अत्याचार वाढले आहेत. आपले काय म्हणणे आहे?
ईश्वरजी ः तुम्हाला देशाचे पाहिजे की जगाचे? एकच काही तरी सांगा. माझ्याकडे बिल्कूल वेळ नाही. बी स्पेसिफिक.
- ओके, सर. फक्त भारताविषयी सांगा.
ईश्वरजी ः आता प्रत्येक गोष्टीला मीच जबाबदार आहे, असे तर तुम्हाला म्हणायचे नाही ना? कोणतेही काम करायचे असेल तर संबंधिताला पैसे चारण्यासाठी तुम्हीच आधी तयार असतात. त्याला मी काय करणार? आपले काम टाळून ते दुसऱ्याच्या गळ्यात कसे बांधायचे, यात तर मानवजमात "एक्स्पर्ट'! त्यामुळेच इतरांवर अत्याचार होतो. आता हे करायला मी सांगतो की काय? एकूणच हा मानवप्राणी फारच अवघड झाला आहे. त्याला कंट्रोल करण्यासाठी काय करावे, यावर आमच्याकडे आता विशेष चर्चासत्र आयोजित केले आहे. त्यातून नक्कीच काही तरी ठोस येईल. तुम्हाला यायचे का चर्चेसाठी "वर'? करू का व्यवस्था?
- सॉरी, सर. तुम्ही दिली तेवढी उत्तरे खूप झाली. आल इज वेल, आल इज वेल... आजची "मन की अदालत' येथेच संपवूया. तुमचा कॉंटॅक्ट नंबर आमच्या वाचकांसाठी द्या ना...
(ईश्वरजींनी दिलेला 50 आकडी कॉंटॅक्ट नंबर पृथ्वीतलावरून लागणे शक्य नसल्याने तो देता येत नाही. श्रद्धाळूंनी तो स्वतःच शोधावा, नास्तिकांनी सोडून द्यावे. क्षमस्व.)
("सकाळ'मध्ये प्रसिद्धी तारीख ः7 मार्च, 2010)

Wednesday, May 26, 2010
रंग बरसे भीगे चुनरवाली,रंग बरसे, होली हैं...
वेलकम बॅक टू "मन का रेडिओ', 172.0 एफएमवर. आज होळी, उद्या धूळवड. तशी तर आजच तुमची धूळवड सुरू झाली असेल नाही? आमची तर सुरू झाली बुवा. त्याचं काय आहे, "मन का रेडिओ'वर आयोजित खास "बोंब मारो बोंब' कार्यक्रमामुळे येथे वातावरण कसे "रंगी'न झालेले आहे. आता हा रेडिओ असल्यामुळे तुम्हाला आमची तोंडं किती आणि कशी रंगली हे कळणार नाही; पण सुरवातीला ऐकविलेल्या गाण्याने एकूणच माहौल कसा असेल कळलेच असेल, तर "बोंब मारो बोंब' कार्यक्रमात आपले स्वागत. या लाईव्ह कार्यक्रमात काही नामांकितांनी धूळवड कशी साजरी केली याचा "आँखो देखा कानो सुना' हाल, तुम्हाला वाचायला मिळणार आहे. तर वाचा...सर्वात प्रथम एक उत्तरभारतीय आमदार काय गाणे म्हणताहेत ते हळूहळू ऐकू येऊ लागले आहे... बोल एकदम अस्पष्ट आहेत... आजूबाजूला सुंदर सुंदर ललनांचा घोळका "डान्स' करीत आहे. गाणे आता स्पष्ट ऐकू येऊ लागले आहे...
अरे पैसा पैसा क्या करती है,
पैसों का मैं ढेर लगा दूं
जो तू हो जाए मेरी....
यावर सदर विधायकाने जो काही डान्स केला असेल तो लिहिणे अवघड आहे. पाहणे तर त्याहून अवघड. आता पुढे जाऊ या. इथे पोस्ट मास्तर जनरल असे फारच "जनरल' वाटणारे पद भूषविणारे एक महाशय काय म्हणतात ते पहा -
दे दे मुझे तू घूस
दो कोटी बारा आणा,
मारे गा भैय्या ना ना!
आता या "जनरल'चे उर्वरित दिवस हवालातमध्ये जावोत, अशा शुभेच्छा देऊन पुढे सरकू या. अरेच्चा इथे हा कोण बसलाय वस्तूंची मोजदाद करीत? कल्याण-डोंबिवलीतला अधिकारी दिसतोय... एक जबरदस्त फ्लॅट, त्यात बाथरूम... बाथरूम म्हणजेच एक स्वतंत्र फ्लॅट... सहा प्लाझ्मा टीव्ही, 100 पॅंटी, 150 शर्ट, 50 टीशर्ट... इ. इ. त्याचे हे बडबडगीत...
""अरेरे.... किती कष्टाने... किती लोकांच्या मुंड्या मुरगळून हे पैसे जमविले होते रे... कोणा नतदृष्टाची दृष्ट लागली रे... सगळे गेले रे... बुरा ना मानो होली है रे...''
पुढे सरकूया... इथे तर शतकातील सर्वात महान क्रिकेटपटू बिस्किटे खात बसलाय. त्याला काही विचारले तर तो म्हणतो, "मेरा दोस्त आनेवाला हैं, मेरा दोस्त आनेवाला हैं. आप भी हो सकते हैं...' तो फक्त एवढे म्हणतानाच हसतोय. इतर वेळी मात्र गप्प. एकदम चिडिचिप. अरे बाबा आता महाराष्ट्र शासन तुझ्यासाठी "म्युझ्यम' बांधणार, तुझ नाव "भारतरत्न'साठी सुचविणार एवढे सांगितले तरी हा सिरिअसच. होली है... म्हंटले तरी सिरिअसच. त्याला विचारले तर तो म्हणाला, ""बॉईज प्लेड वेल. मी पण प्लेड वेल. पण मी आता दोनशे काय मारले सगळ्यांना मी महान असल्याचा साक्षात्कार झालाय. इतके दिवस मला नावं ठेवायचेत. सेंच्युरी झाली की आऊट होतो म्हणून.''
"मग ते काय खोटे होते?' असे म्हणून कोणी तरी या महान क्रिकेटपटूवर रंग टाकला अन् लंपास झाला. बुरा ना मानो... होली हैं...
("सकाळ'मध्ये प्रसिद्धी तारीख ः 28 फेब्रुवारी, 2010)

गाणे हिट होते पब्लिकमुळे!
वेलकम बॅक टू मन का रेडिओ. 172.0 एफएमवर. पिक्चरमधील गाणे हिट होते कोणामुळे असा वाद सध्या आमीर खान - जावेद अख्तरमध्ये सुरू आहे. आमीर म्हणतो, गाणे स्टारमुळे हिट होते, तर जावेदभाई म्हणतात गीतकारामुळे. या वादात कॅटरिनाने तेल ओतले असून गाणे संगीतकारांमुळे हिट होते, असा सूर आळवला आहे. यात आता "मन का रेडिओ' अणुबॉंब टाकणार आहे. त्याचं काय आहे की, "मन का रेडिओ'ने वाचकांचा घेतलेला कौल वेगळेच सांगतो. त्यांचे म्हणणे आहे, "गाणे हिट होते ते पब्लिकमुळे'! या कौलाअंतर्गत प्रातिनिधिक म्हणून घेण्यात आलेली "प्रचंड' सिनेप्रेमी मुन्नाभाई यांची मुलाखत वाचा... पण या गाण्याच्या ब्रेकनंतर...
खेत गये बाबा,
बाजार गई मॉं
कैसे आये गोरी
हम तोरे घरमा...
मुन्नाभाई ः आऊ ललिता, काय भारी गाना लावला. एकदम तब्येत हरीभरी झाली. मला इथे बोलावून तुम्ही जे भी काही केले ना, त्याबद्दल मी तुमचा "थॅंक्यू' आहे.
- मुन्नाभाई, तुम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून "फर्स्ट डे फर्स्ट शो' हिंदी पिक्चर पाहता. मग तुम्हीच सांगा गाणे कोणामुळे हिट होते ते!
मुन्नाभाई ः अरे बाबा, माझी अख्खी जिंदगी थिएटरमधी गेली. मी बाहेर कमी अन् थिएटरमध्ये जादा असतो. आतापर्यंत एकबी पिक्चर सोडला नाय. राजकपूरच्या "श्री 420'पासून ते पार "थ्री इडियट'पर्यंत! मिथुनदाचा "गुंडा'सारखा फालतू चित्रपटही पाहिला या पठ्ठ्यानं. "गुंडा' चित्रपट पाहिला होता का तुम्ही. नाही...? बरे झाले... नाही पाहिला ते. इतका "इमोशनल अत्याचार' अन् ते पण पब्लिकवर मी नाय पायला. अरे बाबा तुम्ही वर गाणे वाजवले ना, त्यात लिहिणाऱ्याने काय अकलेचे तारे तोडले आणि वाजवणाऱ्याने काय बडवले, तुम्हीच सांगा. पण माझ्यासारख्याची तब्येत हरीभरी झाली का नाय? अरे बाबा असेच असते. कोणाला काय आवडेल काय सांगता येते का? उगाच फालतूचा लफडा कोणी सांगितला. म्हणे गाणे माझ्यामुळे हिट झाले अन् त्याच्यामुळे! अरे, बाबा आमच्यासारख्या पब्लिकने असल्या गाण्यांना डोक्यावर घेतले म्हणून तर ते हिट झाले ना? आता तूच सांग "बिग बी' गातो म्हणून अनेक बड्या स्टारनी पब्लिकवर गळा साफ करून घेतला. आमीरभाई, संजू बाबा, गोविंदा, श्रीदेवी हे म्हणजे काय "गानसम्राट' अन् "गानसम्राज्ञी' आहेत का काय? त्यांचे गाणे कोणी गोड मानून घेतले, पब्लिकने! मग खरे गाणे हिट कोण करते - पब्लिक! माझ्या पसंतीचे एक गाणे लावा बरं...
ओ... सजना,
क्या ये मेरा पहेला पहेला प्यार हैं!
मुन्नाभाई ः ऐकला का गाना? काय वाटते? अरे सदर नटी आता किती वेळा प्रेमप्रकरणात पडणार, असाच सवाल उभा राहते की नाही? आता अशा ओळी ही गीतकार मंडळी लिहिणार असली तर काय म्हणणार? सुपरस्टारचे गाणे फ्लॉप होत नाही किंवा चांगले गाणे असले तरी चित्रपट फ्लॉप होत नाही, असे तर काही नाही ना!
मुन्नाभाईंच्या क्रांतिकारक विचारांनंतर खालील गाणे वाचा, विचार करा, संशोधन करा अन् पहिल्या ओळीतील शब्दांचा अर्थ हाती लागल्यास पाठवून द्या "मन का रेडिओ'कडे...गाणे असे आहे-
केंदी पो... पची केम,
केंदी ए...ओ जाने जाना...
गोरी दे नखरे सोने लगदे...
मेनू गोरी दे नखरे...
("सकाळ'मध्ये प्रसिद्धी तारीख ः 21 फेब्रुवारी, 2010)

"लोकल' कॉमेंट्री!
वेलकम बॅक टू मन का रेडिओ... 172.0 एफएमवर आपले स्वागत आहे. आज तुम्ही ऐकणार आहात तो विषय दोन दिवस जुना असला तरी हिट आहे. त्याचं काय आहे की, दोनच दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी "लोकल'ने सफर केली. आता या लोकलमध्ये काय झाले, कसे झाले याची लाईव्ह कॉमेंट्री तुमचा आवडता आरजे पद्याने रेकॉर्ड करून ठेवली आहे. ही कॉमेंट्री त्यामुळेच "एक्स्कुझिव्ह' झाली आहे. तीच कॉमेंट्री पुन्हा प्रसारित करीत आहोत... तर मग वाचा ओन्ली ऑन मन का रेडिओ...वेलकम टू मन का रेडिओ...राहुल गांधी यांचा ताफा अंधेरी रेल्वेस्थानकाकडे निघाला आहे. आणि हे काय, त्यांची गाडी थांबली. एक्स्ट्रॉ कव्हरला एक एक्स्ट्रॉ सुरक्षा रक्षक, मिडऑनला एक, गलीत एक... राहुलजींनी आता खिशात "हात' घातलाय. पुन्हा बाहेर काढलाय. हातात बहुतेक काही तरी कार्ड दिसतंय. फुटबॉल पंच दाखवतात तसं नाही. ते तर एटीएम कार्ड आहे. आता ते नजीकच्या "एटीएम'मध्ये घुसलेत. बाहेर आलेत. आणि हे काय... ते थेट रांगेत उभे! तिकीट देणाराच आश्चर्याने गोरामोरा झालाय. तिकीट काढून ते आता लोकलमध्ये घुसताहेत. आमचीही त्यांच्यामागे लोकलमध्ये घुसण्याची धडपड सुरू आहे. ते तर आरामशीर चढले... पण आमचा पाय... पाय... आई गं... पाय स्टेशनवरच राहिला की काय? आला... आला.. आत आलाय पाय! हुश्श... चढलो बुवा एकदाचे लोकलमध्ये... मायक्रोफोन सांभाळत. पण राहुल गांधी कोठे गेलेत? कोठे गेले... त्यांना आम्ही लवकरच शोधून काढूत... तोपर्यंत ऐका एक टाईमपास गाणे...अरे दिवानों मुझे पहचानोंमैं हूँ कौन, मैं हूँ कौन,खान खान खान...राहुल गांधी बहुतेक पुढच्या डब्यात पोचलेत वाटते. आम्हीही एक एक इंच भूमी लढवत पुढे पुढे सरकत आहोत. पण हे काय... हा एक हिरोसारखा दिसणारा कोण? "र र र राहुलजी, माय नेम इज... मी आता "फोर्टी प्लस' झालोय. मी पिक्चरमध्ये म्हातारा झालोय; पण राजकारणाच्या दृष्टीने तरुणच आहे. मलाही राजकारण जॉईन करायचंय. माझेही प्रयत्न सुरू आहेत... र..र...राहुलजी... असे ओरडत तोही हळूहळू पुढे सरकत आहे. आणि हा डोक्याला टक्कल पडलेला "कॉमन मॅन' मध्येच कुठून आला. त्यालाही भेटायचे म्हणे, राहुलजींना! तर मंडळी राहुलजींना गाठेपर्यंत ऐकूया या "कॉमन मॅन'चे मत या "लोकल यात्रे'बद्दल...मित्रा, "कॉमन मॅना' या इथे गर्दीत काय करतोयस तू... "कॉमन मॅन'ने इकडेतिकडे बिचकत बिचकत पाहिले आणि हळूच एक चिठ्ठी हातात दिलीय. थांबा उघडूनच पाहतो. अरेच्या यात तर शेतकऱ्याच्या आत्महत्या, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, विषमता... मुंबई... असे शब्द दिसताहेत. कशाला नसती झंझट. ताबडतोब खिशात ठेवलेली बरी. "ऑल इज वेल'! अरे सामान्य माणसा, मी तुझी चिठ्ठी पोचवतो, राहुलजींकडे... ते नक्कीच करतील काही तरी... आता राहुलजींमध्ये आणि आमच्यात दोन डब्यांचे अंतर पडलेय. सगळीकडे उत्साही वातावरण... ताफा पुढे पुढे सरकतोय... आमच्या हातात "कॉमन मॅन'ची चिठ्ठी तशीच आहे... आता रेंज चाललीय. मन का रेडिओची कॉमेंट्री येथेच संपवीत आहोत. खर्ररर खर्रररर...
("सकाळ'मध्ये प्रसिद्धी तारीख ः 7 फेब्रुवारी, 2010)

स्थानिक भाषा!
सुस्वागतम, सुस्वागतम... पुन्हा एकदा आपले स्वागत आहे "मन का रेडिओ'वर अर्थात 172.0 एफएमवर! मंडळी काही तरी चुकल्या चुकल्यासारखे वाटतेय ना! अगदी बरोबर. आमची सुरवातीची घोषणा शुद्ध मराठी तुपात घोळण्याचा आटोकाट प्रयत्न आम्ही केलाय. पण काय करणार, शेवटी "मन का रेडिओ' आणि "एफएम' या हिंदी-इंग्रजी मिश्रित शब्दांनी आमचे तूप एकदम "डालडा' करून टाकले. आता भाषांची अशी सरमिसळ झालीय की, आमचीच काय कोणाचीही बोली सुधारणे अवघड झाले आहे. असो! काही दिवसांपूर्वीच टॅक्सी चालविण्याचा परवाना पाहिजे असेल तर त्या व्यक्तीला मराठी येण्याचे कम्पल्सरी करण्यात आले होते. शिवाय, तो किमान 15 वर्षे महाराष्ट्राचा रहिवासी असणेही आवश्यक करण्यात आले होते. पण या काही दिवसांपूर्वीच्या दुसऱ्याच दिवशी हा आदेश बदलून "मराठी'ऐवजी "स्थानिक' भाषा असे करण्यात आले होते. त्यामुळे आता अशा व्यक्तीला मराठीबरोबरच गुजराती, हिंदी आदी भाषा आल्या तरी चालण्यासारखे आहे. आम्हाला तर वाटते, प्रत्येक टॅक्सीचालकाला किमान आठ-दहा स्थानिक भाषा आल्याच पाहिजेत! कोण जाणे, कधी कोणत्या भाषेचे काम पडेल! कल्पना करा... जर मराठी कम्पल्सरी केली असती, तर काय बहार आली असती. महाराष्ट्रभरात आणखी एक नवा उद्योग विकसित झाला असता तो म्हणजे भाषा शिकविण्याचा! सर्व बिहारी, यूपीवाल्या मंडळींना थेट मराठी कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घ्यावा लागला असता... एवढेच कशाला थेट यूपी, बिहारमध्येच "सुलभ मराठी कोचिंग क्लासेस' सुरू झाले असते. अर्थात त्याची मूळ शाखा मुंबई, पुण्यातच राहिली असती! या क्लासेसना कदाचित लालूजी आणि मुलायमजींनी मग अनुदानही दिले असते. एवढेच कशाला बिहारी, यूपीच्या भाषेतच "मराठीचे व्याकरण' प्रा.रस्तोगी, प्रा.चौधरी अशा नावाच्या मंडळींनी पुस्तकावर पुस्तके काढून शिकविले असते! या नव्या उद्योगातून किती बिहारी आणि मराठी बांधवांना रोजगार मिळाला असता नाही!
(ता. क. वेलकम बॅक टू "मन का रेडिओ, 172.0 एफएम' अशी आरोळी आम्ही दरवेळी ठोकतो; पण त्यातूनही अनेक गमतीजमती होत आहेत. काही मंडळी 172.0 एफएम थेट त्यांच्या मोबाईलच्या एफएमवर ट्यून करून पाहत आहेत! "मन का रेडिओ' न लागल्यावर म्हणे एखाद्या तज्ज्ञाला गाठून हे स्टेशन का ट्यून होत नाही, यावर सल्लाही घेत आहेत. त्यावर तज्ज्ञ मंडळी हा रेडिओ अजून लॉंचच झाला नाही. थोडे सबुरीने घ्या, असा सल्लाही देत आहेत...! मंडळी "मन का रेडिओ' हा जगातील पहिला "लेखी रेडिओ' आहे. त्यामुळे तो फक्त तुम्हाला येथेच, याच जागेवर, याच दिवशी वाचायला मिळेल. इतरत्र नाही...! तो लगे रहो...)
("सकाळ'मध्ये प्रसिद्धी तारीख ः 24 जानेवारी, 2010)

Tuesday, May 25, 2010
लग्न सानियाचे...
सासरला ही सानिया निघाली
भारतीयांची लाडी,
नेसली दुबईची साडी...
अरे...रे...रे... चक चक, हुंदकेच हुंदके... "वेलकम बॅक टू मन का रेडिओ.' अशा या हुंदकाळलेल्या वातावरणात वरचे रिमिक्स गाणे वाचून तुमचे मन आधीच भारी झाली असेल तर आजचा "मन का रेडिओ' वाचताना पार दुःखाच्या सागरतळाला जाण्याची तयारी ठेवा. हा इशारा नव्हे, "वॉर्निंग' आहे. मन घट्ट केले असेल तरच वाचा... नाही तर सोडून द्या... कधी नव्हे ते आम्हा भारतीयांना "क्रिकेट' सोडून दुसरा कोणता विदेशी गेम कळला असेल तर तो म्हणजे "टेनिस' अन् तोही कोणामुळे कळला असेल तर ती म्हणजे सानिया मिर्झा. "गेम', "सेट' "मॅच पॉइंट', "लव्ह ऑल' इ. इ. शब्द कळले ते सानियामुळेच. अशी ही सानिया हैदराबादी सोहराबशी लग्न करणार हे मागे कळाले तेव्हाच अनेक नवतरुणांचा हार्टफेल व्हायचे शिल्लक राहिले होते. तो धक्का कसाबसा सहन करून, चला जाऊ द्या सानिया हैदराबादेत का होईना, सोहराबची का होईना भारतात आहे ना, अशी आपल्या मनाची समजूत घालून तिचे चाहते कसेबसे दिवस काढीत होते. पण आता... चक्क पाकिस्तानी क्रिकेटपटूशी (नाव कशाला घ्यायचे?) लग्न करून दुबईवासी होणार हे कळल्यापासून तिचे अनेक चाहते तर नुसतेच नावाला जिवंत आहेत, असे आमच्या दृष्टोत्पत्तीस म्हणजेच नजरेस पडले आहे. आता या गंभीर प्रसंगावर वाचा तिच्या चाहत्यांच्या खालील प्रतिक्रिया ः
चाहता नं. 1 (गाण्यानेच सुरवात करीत) ः परदेसी, परदेसी जाना नहीं, हमें छोड के, हमें छोड के! काय बोलू शब्दच फुटत नाहीय. आता आम्ही काय त्या धस्कट पेस आणि भूपतीचा खेळ पाहायचा की काय? आता "टेनिस'मध्ये काही राम उरला नाही. भारतीय टेनिसविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सानियाच्या सासरच्यांना टेनिस आवडत नाही म्हणे! म्हणजे बोंबला, आता ते तिला काय खेळू देणार? हा म्हणजे हातानेच पायावर "रॅकेट' मारून घेतली, असा प्रकार झाला आहे.
चाहता नं. 2 (गाण्यानेच सुरवात करीत) ः बाबूल की दुआएँ लेती जा, जा तुझको सुखी संसार मिलें... जे झाले ते झाले. कोणाशी लग्न करायचा हा तिचा पर्सनल प्रश्न आहे. उगाच तिच्या पर्सनल लाईफमध्ये लुडबूड करणारे आपण कोण? अहो, हे लग्न साधेसुधे नाही. इंटरनॅशनल लग्न आहे इंटरनॅशनल! त्यामुळे दोन्ही हाडवैरी देश जवळ येतील. सब तरफ होगी, शांती चारो ओर... एक दिन... खरं म्हणजे एखादा शांततेचा पुरस्कार स्थापन करून आपणच तो सानियाला द्यायला हवा, "नोबेल' मिळेल तेव्हा मिळेल.
चाहता नं. 3 ः का? पण का? असे का केले सानियाने? व्हाय? व्हाय नॉट शादी इन इंडिया... मेड इन इंडिया ना? मग पाकिस्तानचे एवढे प्रेमाचे भरते का? आखीर क्यूँ... (या चाहत्याची क, का, की, की ची बाराखडी काही संपत नाहीय, नेक्स्ट्...)
चाहता नं. 4 (गाण्यानेच सुरवात करीत, गाण्यावरून बरेच वयस्कर दिसतात) ः "जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी राहा....' मुली... मुली... (स्वर कातर झालेला) आमच्यासारख्या तमाम ज्येष्ठ नागरिकांकडून तुला लग्नाच्या शुभेच्छा बरं का! हॅप्पी मॅरेज इन ऍडव्हान्स. आमची दृष्टी अधू झाली, ऐकायला व्यवस्थित येत नाही तरी बरं का चाहते म्हणून आम्ही तुझी एकही मॅच टीव्हीवर पाहायला चुकविली नाही बरं का! लग्न म्हणजे आपल्या हातात असते काय? त्या प्रारब्धाच्या गोष्टी. तुझा "टायअप' पाकिस्तानी क्रिकेटपटूशीच असेल तर तू तरी त्याला काय करणार? डरने का नहीं, रुकने का नहीं, लाईफ में चलते रहनें का, फिर टेंशन काय को लेने का?
मंडळी, "मन का रेडिओ'कडे "लग्न सानियाचे' या विषयावर प्रतिक्रिया देण्यासाठी स्टुडिओबाहेर रीघ लागली आहे. ती कंट्रोलला येईल असे दिसत नाही. तेव्हा घेऊया एका आठवड्याची विश्रांती, पुन्हा भेटूया...याच अंकात... याच दिवशी... पण जागा मिळेल तिथे.......!

Saturday, May 22, 2010
पालकाची जुडी...
सहाची ती गाडी गेली आता
नवाची बी गेली आता
बाराची गाडी निघाली
मला जाऊ द्या ना घरी
वाजलेची तीन-तेरा...
वेल कम टु मन का रेडिओ 172.0 एफएम. मंडळी मन का रेडिओच्या घड्याळीत आता तीन-तेरा वाजले आहेत; म्हणजेच तीन वाजून 13 मिनिटे झाले आहेत, त्याप्रमाणे तुमच्या घड्याळीचा टायमिंग सेट करू नका. आमचे घड्याळ थोडे इंटरनॅशनल आहे. आजकाल पेशन्स एवढी वाढली आहे, की कोणालाही वाटते कोठे तरी जाऊन आत्महत्या करावी; म्हणजे सुटलो बा एकदाचे! अहो, एवढेच कशाला अगदी शाळकरी मुलांनाही टेंशन अभ्यासाचे, डॉक्टर बनण्याचे, इंजिनिअर बनण्याचे!! त्यांनाही वाटायला लागले करून टाकावी एकदाची आत्महत्या. पालकांना बसा म्हणावं बोंबलत. तर मंडळी अशा या घनघोर परिस्थितीत मन का रेडिओच्या स्टुडिओत आज आली आहे पालकाची जुडी... माफ करा जोडी आणि त्याच्याबरोबर आला आहे चौथीत शिकणारा त्याचा मुलगा. जाणून घेऊ या त्याचे मन. तो पढते रहो मन का रेडिओ 172.0 एफएमवर. तर माझा पहिला प्रश्न विद्यार्थ्यांच्या वडिलांना आहे- तुमचा मुलगा चौथीत आहे. तुम्ही त्यांच्या करिअरसाठी आतापर्यंत काय केले? (वडील बोलण्याचा प्रयत्न करतात तेवढ्यात आईची कॉमेट्री सुरू होते.)
आई : अहो, या कारट्यासाठी काय केले नाही ते विचारा? याचा जन्म झाला नव्हता तेव्हापासून खसता खातो कशासाठी... बी फोर बर्थ. मी त्यांना सांगून ठेवले होते, चांगली इंग्रजी शाळा बघून आधीच ल1/2गा लावून ठेवा; नंतर मुलाला प्ले ग्रुपमध्ये टाकायचेसुद्धा होतील वांदे. आमचे कसे सगळे प्री-प्लॅन असते. मुलगा शंभर टक्के डॉक्टर व्हायला पाहिजे किंवा इंजिनिअर.
वडील : अगं ते सांगना ट्युशनचे...
आई : तेच तर सांगत होते. हा पहिलीत गेलाना तेव्हापासून ट्युशन लावली याला, नाही तर आजकाल पोरं पार वाया जातात. याचा टाइप टेबलच पाहा ना. सकाळी साडेसात ते दुपारी एक शाळा, दुपारी दोन ते पाच ट्युशन, संध्याकाळी सहा ते आठ अभ्यास, आठ ते दहा टीव्हीवरील सिरिअल. पुढे झोप.
-अहो, हा खेळतो कधी?
आई : तेच तर सांगत होते. आमचा मुलगा कोणत्याही क्षेत्रात मागे पडायला नको म्हणून आम्ही डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवून आहोत. घरात सर्व प्रकारची खेळणी उपलब्ध आहे; फक्त आम्ही त्याला उन्हाळ्याच्या सुटीत खेळ एवढेच सांगतो. मध्ये खेळला तर त्याला माझा एक धपाटा बसतो पाठीत.
वडील : अगं, उन्हाळ्याच्या सुटीत डान्स क्लास लावला होता त्याचे सांग ना...
आई : तेच तर सांगत होते...
आईने ते सांगण्यापूर्वी वाचू या एक रिमिक्स गाणे...
तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा
डॉक्टर की औलाद है डॉक्टर बनेगाडा
न्स पे चॉन्स मार ले,
सोनिया...डान्स पे चॉन्स मार ले
मंडळी वेलकम बॅक टू मन का रेडिओ. आपण जाणून घेत आहोत पालकांचे मन. आपल्याकडे आलेल्या या विद्यार्थ्याने डान्स पे काय चॉन्स मारला हे ऐकू या त्याच्या आईकडूनच.
आई : "तेच तर सांगत होते... अगदी तीन वर्षांचा होता तेव्हाच त्याचे पाय पाळण्यात दिसले. आम्ही सारखे म्हणायचो एक पाय नाचो रे गोविंदा.गोविंदासारखा डान्स यावा म्हणून आम्ही त्याला गोविंदा डान्स अकादमीमध्ये टाकलं आणि त्याने चान्स मारला. अभ्यासाकडे पार दुर्लक्ष केलं.
वडील : अहो, सहामाही परीक्षेचा रिझल्ट पाहा ना, या कारट्याचा... त्याला पडले 95.05 टक्के मार्क.
आई : अहो, तुम्हीच सांगा आताच्या कॉम्पिटिशनच्या जमान्यात एवढ्या मार्कने काय होते? तो शेजारचा राहुल बघा 95.07 टक्के मार्क मिळवून शाळेत फर्स्ट आला; पण हा गधडा सेंकड. आता हा डॉक्टर कसा होणार, इंजिनिअर कसा होणार! मला तर बाई भारी टेंशन येते. तरी मी म्हणत होते आणखी एक ट्युशन लावून टाका म्हणून. फार बिघडला हा. मंडळी या बिघडल्यावर वाजवू या एक सुपरहिट गाणेअम्मा देख तेरा मुन्ना बिघडा जाय पापा देख तेरा मुन्ना बिघडा जाय मंडळी आपल्याकडे स्टुडिओत आलेला हा बिघडलेला मुलगा खरंच बिघडलेला आहे का? त्याला सुधारण्यासाठी काय करावे? त्याला आणखी एखादी ट्युशन लावावी का? त्याच्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या, खसता खाणाऱ्या त्याच्या आई-वडिलांना त्याने फर्स्ट येऊन दाखवू नये का? आपल्याकडे डॉक्टर, इंजिनिअर यापेक्षा कोणता चांगला व्यवसाय शिल्लक नसताना या मुलाने तरी डान्सच्या मागे का लागावे? या प्रश्नांची उत्तरे फटाफट पाठवा मन का रेडिओकडे. लकीविनरला मिळेल गिफ्ट हॅम्पर अमुकअमुक ट्युशन क्लासेसकडून...
(सकाळमध्ये प्रसिद्धी तारीख ः 17 जानेवारी, 2010)

दरोडा टाळण्यासाठी "चाकुमि' त्रिसूत्री
"मन का रेडिओ'च्या "दरोडा स्पेशल' बातमीपत्रात आपले स्वागत.आजच्या ठळक बातम्या.औरंगाबाद शहरातील वाढत्या दरोड्यांच्या आणि त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या आवाहनामुळे शहरात चाकू, कुऱ्हाडीबरोबरच मिरची पूडची मागणी प्रचंड वाढली आहे. या वस्तू रेशनकार्डवर उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी महिला संघटनांकडून पुढे आली आहे. दरोड्यासंदर्भातील पोलिसांच्या भूमिकेचे जागतिक स्तरावर स्वागत होत असून, दरोडाप्रकरणी नागरिकांनी तक्रारी नोंदवून पोलिसांना विनाकारण त्रास देऊ नये, असाही उपाय सुचविण्यात येत आहे. दरम्यान, पोलिस यंत्रणा दरोड्यांमुळे सक्रिय झाली असून, "तपासू सुरू आहे.' आता सविस्तर वृत्तांत ः औरंगाबाद शहरात काही दिवसांपूर्वी सराफा व्यापाऱ्यावर पडलेल्या "धाडसी'(!) दरोड्यामुळे शहराचे नाव जागतिक नकाशावर गेल्याचे मानले जात आहे. त्यातच "सीसीटीव्ही'वर याचे (चुकून) चित्रीकरण झाल्यामुळे या दरोडेखोरांचा तपास करणे हे पोलिसांचे नैतिक कर्तव्यच झाले आहे! दरोड्याचे प्राथमिक तपासाचे कामच "सीसीटीव्ही' कॅमेऱ्याने केल्यामुळे आता दरोडेखोर पकडण्याचे काम पोलिसांच्या डाव्या हातचा मळ असल्याचे मानले जात आहे. त्यादृष्टीने पोलिसांचा जोरदार तपास सुरू असून, तपासाने एवढा वेग घेतला आहे, की कोणाही पोलिसाला विचारल्यास तो "तपास सुरू आहे' हेच वाक्य आपल्या तोंडावर फेकतो. त्याशिवाय कोणतेही वाक्य उच्चारत नाही. त्यांना रात्रंदिवस याच एका गोष्टीचा ध्यास लागला आहे. सराफा व्यापाऱ्यांनी स्वसंरक्षणार्थ "चाकू, कुऱ्हाडी, मिरची पूड' ("चाकुमि' त्रिसूत्री) जवळ बाळगावी, असा बहुमोल सल्ला पोलिसांनी दिल्यामुळे जगभरातून पोलिसांच्या या सल्लेबाजीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. समोर दरोडेखोर हातात बंदूक घेऊन उभा राहिल्यावर त्याला "टाइम प्लीज' म्हणत खिशातून तिखटाची पूड कशी काढावी, किंवा काउंटरच्या कप्प्यात दडवून ठेवलेली कुऱ्हाड कशी काढावी, दरम्यान, दरोडेखोराने "ठो।।। ठो।।।' केल्यावर स्वतःच चालत स्वर्गरथ गाठावा की हॉस्पिटल, याबाबत पोलिसांनी मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा सर्वसमान्यांकडून व्यक्त होत आहे. शिवाय कुऱ्हाडीला धार कशी लावावी, मिरची पूडची फेक कशी करावी, याचे प्रशिक्षण देणारे छोटे-छोटे कोर्सेस "हप्त्या-हप्त्या'ने (म्हणजे आवठवड्याने) दिल्यास उपयुक्त ठरतील, अशीही मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे. पोलिसांच्या आवाहनामुळे चाकू, कुऱ्हाडी आणि विशेषतः मिरची पूडची मागणी प्रचंड वाढली असून, याची काळ्याबाजारात विक्री होत असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे हा काळाबाजार रोखून या वस्तू रेशनकार्डवर मिळाव्यात असेही मत व्यक्त होत आहे. दरम्यान, पोलिसांकडे अनेक महत्त्वाची कामे असताना (राजकीय सभांचा बंदोबस्त, शाहरुख खान पॅटर्नचे वाद, क्रिकेट सामन्यांचे वाद) दरोड्यासारख्या किरकोळ कामांत त्यांना गुंतवू नये, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. दरोडेखोर आल्यास स्वसंरक्षणार्थ "चाकू, कुऱ्हाडी, मिरची पूड' अर्थात "चाकुमि' ही त्रिसूत्री अवलंबावी किंवा सरळ-सरळ त्या दरोडेखोराला पाहिजे तेवढा माल स्वहस्ते काढून द्यावा. त्यामुळे त्याला अत्यानंदाने हार्टऍटॅक येऊन दरोडा मन का रेडिओदरोडा टाळण्यासाठी "चाकुमि' त्रिसूत्री!टळेल. तरीही दरोडा पडलाच तर पोलिसांना त्रास होईल अशा तक्रारी करीत बसू नये. आपल्याकडे अधिकची संपत्ती झाली होती, ती दरोडेखोरांनी कमी केली त्यामुळे आपलेच ओझे हलके झाले, अशी संन्यस्त वृत्ती बाळगावी. असे केल्यास आपले स्वास्थ्य चांगले राहील, असे मत धार्मिक वर्तुळातून व्यक्त होत आहे. आजचे ताजे बातमीपत्र संपले. तपास सुरू आहे...
(सकाळमध्ये प्रसिद्धी तारीख ः 2 फेब्रुवारी 2010)

Thursday, May 20, 2010
बजेट घरघरचे...
वेलकम बॅक टू मन का रेडिओ... 172.0 एफएमवर. मार्च महिना म्हटला की, लहान मुले सुद्धा "ब' बजेटचा अशी घोकंपट्टी करू लागतात (थोडे जास्त झाले का? सोडून द्या). एकूणच काय की मार्चमहिना बजेटमय होऊन जातो. या पार्श्वभूमीवर "मन का रेडिओ' सादर करीत आहे "बजेट घरघरचे'! यात महिना एक लाख रुपये कमावणाऱ्यापासून ते पाच हजार कमावणाऱ्या व्यक्तीची गृहिणी (घरातील अर्थमंत्री असल्याने) आपला महिन्याचे बजेट सादर करणार आहे. तर वाचू या हे अनोखे बजेट...
गृहिणी नं. 1 (महिना उत्पन्न 1 लाख) ः सर्वात प्रथम म्हणजे मला बजेटबिजेट बनवायला बिलकूल वेळ नाहीय. त्यामुळे माझ्या पी.ए.नेच ते बनविले आहे. त्याला मार्गदर्शन मात्र माझेच आहे. तर माझे बजेट असे ः नोकरचाकर खर्च 20 हजार (यात भांडेवाली, कपडे धुणारी (तिलाही वॉशिंगमशीन आहेच), फरशी पुसणारीपासून ते स्वयंपाक करणारी, मुलाला सांभाळणारी बाई, गार्डन सांभाळणारा माळी आदींचा खर्च यात येतो), मेडिकल खर्च 10 हजार. डोक दुखलं, उगाच घबराट झाली, वजन वाढलं, वजन घटलं असं काहीही झालं तरी मी रिस्क घेत नाही. तत्काळ दवाखाना गाठते. फॅमिलीतील इतरांचीही काळजी अशीच घेते. त्यामुळे एवढे पैसे तर वेगळे ठेवावेच लागतात. पॉकेटमनी 10 हजार. माझा मुलगा फार हौशी. मोबाईल कंपनीने मोबाईल लॉंच केला, कोणत्याही कंपनीची गाडी आली रे आली की त्याला नवे मॉडेल पाहिजे असते. शिवाय आठवड्यातून तीन-चार वेळा त्याला मित्रमंडळींबरोबर पार्टी करावीच लागते. आता स्टेटस् राखायचे म्हणजे हे करावेच लागते. पॉकिटमनी मस्टच आहे. शॉपिंग 50 हजार! शॉपिंग करणे ही माझी हॉबी आहे. एक दिवस नवी वस्तू आणली नाही ना मला करमतच नाही. आज काय अमूक बाजार, उद्या काय तमूक बाजार. मनोरंजन 10 हजार. यात पिक्चर, स्टेज शो पाहिल्याशिवाय मला चैनच पडत नाही. पुढे...
- अहो बाई तुमचे झाले की एक लाख. बाकी काही जीवनावश्यक बाबींवर खर्च करता की नाही?
गृहिणी नं. 2 (महिना उत्पन्न 25 हजार) ः आता हे काय उत्पन्न आहे? तरी यांना म्हणत असते नोकरी सोडून दुसरं काही पहा म्हणून. असो. अहो साधा हिशोब आहे. 5 हजार फ्लॅटचे भाडे, 5 हजारांचा किराणा, 5 हजारांची बिलं, 5 हजार एज्युकेशनल खर्च, 1 हजार पेट्रोल, 1 हजार... जाऊ द्या. बाकी राहते शून्य. महिन्याच्या शेवटी पुन्हा "दे दान सुटे गिऱ्हाण' म्हटल्यासारखे उधारी मागत फिरावे लागते.
गृहिणी नं. 3 (महिना उत्पन्न पाच हजार) ः आम्हाला कुठे बजेट असते का बाबा? जसे आले तसे दिवस कटवायचे, एवढेच आम्हाला माहित. कोणतेही स्वप्न पहायचे नाही, अन् पाहिलेच तर नंतर त्याची कटिंग करून ते आपल्या बजेटच्या मापात बसवायचे यातच महिना निघून जातो.
मित्रांनो, हे शेवटचे बजेट वाचून तुमच्याप्रमाणेच "मन का रेडिओ' दुखी झालाय. थोडंस फ्रेश होण्यासाठी खालील गाण्याचा तडका घ्या मारून आणि बना दगड...
(चाल ः भोली सूरत दिल के...)
मोटी पगार, बजेट मोटे...
बजेट छोटा और सपने टूटे...
नये जमाने की, ये नयी रीत रे...
हात में मोबाईल, कान में बाली...
कान में बाली रे...
मोटी पगार, बजेट मोटे.....
(सकाळमध्ये प्रसिद्धी तारीख ः 28-3-2010)

Wednesday, May 19, 2010
गिफ्ट प्रकरणाचे देशभरात पडसाद
गिफ्ट खरिदा मैनें तेरे लिए...
उसके लिए लोन निकाला मैनें तेरे लिए...
वेलकम बॅक टू "मन का रेडिओ'... 172.0 एफएमवर... पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आजच्या ठळक बातम्या... सॉरी आजची एकमेव ठळक बातमी... एका भारतीय उद्योगपतीने आपल्या पत्नीस 1600 कोटी रुपयांचे गिफ्ट दिल्यामुळे देशभरातील महिलांत असंतोष उफाळला असून त्याचे पडसाद देशभरातील घराघरांत पडत आहेत. "कहानी घर घर की' अशी परिस्थिती झाली असून आमचे विशेष बातमीदार बंडू भांडाफोडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार या ऐतिहासिक घटनेने देश ढवळून निघाला आहे. अखिल भारतीय महिला अन्याय निवारण संघटनेतर्फे सदर उद्योगपतींचे अभिनंदन करण्यात आले असून देशभरातील इतर तमाम (चिक्कू, गिफ्ट न देणाऱ्या) नवरोबांची सीबीआय चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. आता सविस्तर वृत्त- एका भारतीय उद्योगपतीने 1600 कोटींचे गिफ्ट आपल्या पत्नीस देऊन समस्त नवरे मंडळींना अडचणीत आणले आहे. नव्हे आपल्या हाताने आपल्या पायावर "धोंडा' तोही धोंड्याच्या महिन्यात मारून घेतला, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. अखिल भारतीय महिला अन्याय निवारण संघटनेने सदर घटना गांभीर्याने घेतली असून लवकरच इतर (चिक्कू, गिफ्ट न देणाऱ्या) नवरोबांविरुद्ध देशव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. साधारणतः प्रेमविवाह करणाऱ्या तरुणीला लग्नापूर्वी किती आणि लग्नानंतर किती गिफ्ट मिळाले, याचा संशोधनात्मक, तुलनात्मक अभ्यास करून त्याचा अहवाल सीबीआयने सादर करावा, अशी मागणी जोर धरत आहे. पारंपरिक पद्धतीने विवाह केलेल्या महिलांची परिस्थिती यापेक्षाही भीषण असते. त्यांना थेट लग्नानंतर गिफ्टची अपेक्षा असताना त्यांना 1600 कोटी तर जाऊच द्या साधे 16 रुपयांचे गिफ्टही नवरेमंडळी देत नाहीत, ही खरी खंत असल्याची चर्चा देशभरात होत आहे. इतर
(म्हणजे कोणत्या हे लक्षात घ्यावे) ठिकाणी गिफ्ट देताना मात्र सढळ हाताने उधळपट्टी केली जाते. सर्वसामान्य महिलेची गिफ्टची अपेक्षा तरी किती असणार? एखादा गजरा आपल्या नवरोबाने घेऊन यावा, एवढी अपेक्षासुद्धा पूर्ण होत नाही. याचा निषेध घराघरांतून व्यक्त होत आहे. "गिफ्ट' टाळण्यासाठी कारणे काय, तर पगार पुरत नाही, या महिन्यात आमक्याचे अमुक अमुक देणे आहे, या महिन्यात काय पाहुणे येणार आहेत इ. इ... अशा फुटकळ कारणांना महिला वर्गाने यापुढे तरी भीक घालू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. "गिफ्ट' हा पत्नीचा कायदेशीर हक्क करावा, महिन्यातून कमीत कमी दोन वेळा आणि जास्तीत जास्त कितीही वेळा गिफ्ट देणे नवरोबांना कंपलसरी करणारा कायदा पारित करण्यात यावा, अशी मागणी देशभरातील महिला वर्गाकडून करण्यात येत आहे. एकूणच देशभरात घराघरांत असंतोष उफाळला आहे. सदर उद्योगपतीने 1600 कोटी रुपयांचे गिफ्ट दिल्यापासून प्राप्त आकडेवारीनुसार देशभरात लाखो नवरोबांना तत्काळ "गिफ्ट द्या, नसता...' अशा आशयाच्या फतव्याचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, अखिल भारतीय पुरुष अन्याय निवारण संघटनेतर्फे मात्र सदर उद्योगपतींचा निषेध करण्यात आला आहे. एवढे मोठ्ठे गिफ्ट देण्याची गरजच काय होती, आता याची फळे देशभरातील तमाम नवरोबांना भोगावी लागणार आहे, असे या संघटनेच्या प्रवक्त्याने नवी दिल्लीत सांगितले. एकूणच या "गिफ्ट' प्रकरणामागे एखाद्या परकीय शक्तीचा हात असावा का, याचीही "जॉंच' करावी, अशी मागणी होत आहे. शक्य झाल्यास अमेरिकेने मध्यस्थी करावी, असेही काहींचे (तज्ज्ञांचे) म्हणणे आहे. सदर बातम्या येथेच संपवीत आहोत. सदर उद्घोषकाला तत्काळ "गिफ्ट' खरेदीसाठी जाणे आवश्यक असल्यामुळे त्याला रजा द्यावी. शेवटी वाचा एक गाणे...
मुझको भी तो गिफ्ट दिला दें...
ऐसे ऐसों को दिया हैं,
ऐसे वैसों को दिया हैं,
बंगला, नहीं तो कार दिला दें..
मुझको भी तो गिफ्ट दिला दें...
'सकाळ'मध्ये प्रसिद्धी ता.23-4-10

Sunday, May 16, 2010
भारतीय संघ का हरला? "एमआयडी' चौकशी!
वेलकम बॅक टू मन का रेडिओ... 172.0 एफएमवर आपले स्वागत आहे. मान्य आहे, की तेच तेच स्वागत वाचून तुम्ही आगदी बोर झाला आहात; पण काय करणार, काही काही गोष्टी टाळता येत नाहीत. आपली क्रिकेटची टीम कितीही पराभूत झाली तरी आपण मॅच पाहणे काही सोडतो का? अन् तेही मॅच खेळणे सोडतात का? असो. असे असले तरी "मन का रेडिओ' तमाम क्रिकेट रसिकांच्या भावनांची कदर करते. "भारतीय संघ का हरला' याचा शोध घेण्यासाठी आम्ही तत्काळ "एम.आय.डी'ची अर्थात "सीआयडी'च्या धर्तीवर "मन का रेडिओ इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट'ची स्थापना केली आहे. "एमआयडी'तील प्रमुख सहकारी आहेत- एसीपी दृष्टद्युम्न, गया, कभीकभीजित, डॉ. काळुंके, रॉड्रिक्स इ. तर या सहकाऱ्यांनी थेट वेस्ट इंडिजमध्ये जाऊन "भारतीय संघ का हारला' याचे सविस्तर इन्व्हेस्टिगेशन केले. त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग आमचे बातमीदार बंडू भांडाफोडकर यांनी केलंय आणि त्याचे लेखी रूपांतर आज तुम्हाला सादर करण्यात आम्हाला आनंद होत आहे. तर वाचा "एमआयडी स्पेशल एपिसोड- एक दिन इंडियन टीम के खिलाफ'!
एसीपी दृष्टद्युम्न ः गया, आपण इथं वेस्ट इंडिजमध्ये आलो आहोत, भारतीय संघ का हरला, याचा शोध घेण्यासाठी. याने की वारदात की जगह आपण बरोबर गाठलीय; पण तुला काही क्ल्यू लागलाय का?
(तेवढ्यात रॉड्रिक्स घाबरलेल्या मूडमध्ये धावत येतो. आणि म्हणतो...)
रॉड्रिक्स ः एसीपी... एसीपी... एका स्डेटियमबाहेर एक लाश सापडलीय. क्रिकेट रसिकांचे म्हणणे आहे, की ती भारतीय क्रिकेट संघाची आहे. लाश ताब्यात घेऊन फौरन डॉ. काळुंकेकडे सोपविली आहे. आपल्याला त्यांनी बोलावलंय. (सगळे डॉ. काळुंकेकडे जातात.)
डॉ. काळुंके (भारतीय संघाच्या लाशकडे पाहात) ः एसीपी... लाश काफी श्रीमंत वाटते, म्हणजे ती भारतीय संघाचीच आहे, यात वादच नाही. लाश बुरी तरहसे जखमी हुई है... ठिकठिकाणी उसळते चेंडू लागलेत. आपण इंडियातल्या पाटा खेळपट्ट्यांवरचे शेर. इथं वेस्ट इंडिजमध्ये हेच होणार. आणखी एक गोष्ट लाश फार थकलेली वाटते. म्हणजे मरण्यापूर्वी वेगवेगळ्या पार्ट्या अटेंड केल्याने असे झाले असावे. तिच्यातील जिंकण्याची जिद्द असलेले जिन्स कोणीतरी काढून घेतल्याचे स्पष्ट दिसत आहे. कोणी केले असावे बरे हे काम?
रॉड्रिक्स ः मैं बताऊं बताऊं...
कभीकभीजित ः रहेने दो रॉड्रिक्स... फिर कभी. मला वाटते एसीपी आपण आता एखाद्या पबला भेट देऊन स्थानिक लोकांकडून इन्फर्मेशन घ्यायला हवी.
एसीपी ः मलाही तसेच वाटते. लेटस् गो...
(सर्वजण वेस्ट इंडिजमधील एका प्रसिद्ध पबवर जातात. तेथे सर्वत्र सन्नाटा... दरवाजा लावलेला.)
कभीकभीजित ः वेस्ट इंडिजमधील प्रसिद्ध पब आणि एवढा सन्नाटा? कुछ तो भी गडबड है. दरवाजा भी बंद है. गया तोड दो दरवाजा!
गया ः वारे वाऽऽऽ! सारखे दरवाजे तोडून तोडून माझे तंगडे आऊट झालेय. या रॉड्रिक्सला सांगा ना.
एसीपी ः गया डोंट वेस्ट टाईम. इट इज माय ऑर्डर. तोड दो दरवाजा.
(गया एक लात मारतो, त्यासरशी दरवाजा उघडतो; पण पाय फ्रॅक्चर. आतून विचित्र वास भपकन सर्वांच्या तोंडावर येतो...)
एसीपी ः ये स्मेल कैसी है... ये कहीं पर तो भी सुंघी हुई लगती हैं.
रॉड्रिक्स ः हां सर, ये स्मेल इंडियन टीम कीही है... इसका मतलब उस रात इंडियन टीम यहॉं पबमें पार्टी करने के लिए आई थी.
एसीपी ः अगर उस रात इंडियन टीम यहॉं आई थी तो दुसरे दिन ग्राऊंड में क्या खेली होगी? आणि लाश जखमी झाली ती येथे कोणाशी तरी मारामाऱ्या केल्या म्हणूनच झाली असावी.
कभीकभीजित ः सर केस एकदम साफ है. भारतीय संघ स्वतःच्याच चुकांमुळेच हरला.
एसीपी ः अरे, हेच कारण सांगायचे होते तर "मन का रेडिओ'ने एवढा खर्च करून इथं सातासमुद्रापार आपल्याला कशाला पाठविले असते. सोचो... सोचो... कोई दुसरा अच्छासा कारण होगा...
रॉड्रिक्स ः सर मी किती वेळचा सांगायचा प्रयत्न करतोय; पण कोणी मला बोलूच देत नाही. "वीरू की मॉं' काय म्हणाली, माहितेय ना! भारतीय क्रिकटपटूंना पार्ट्या आणि बायकांपासून दूर ठेवा म्हणून. तेच खरे कारण आहे!
गया ः इनफ इज इनफ... एसीपी काहीही कारणं सांगता. म्हणे भारतीय संघ का हरला. अरे हा काही संशोधनाचा विषय आहे? इतके दिवस इंडियन टीम जिंकत होती, तेव्हा सगळे "चिअर गर्ल'सारखे वेडेवाकडे नाचत होते. ऑस्ट्रेलियासारख्या नंबर वन टीमची हालत आपण पतली करून टाकली, कधी नव्हे ते नंबर वन झालो. तेव्हा कसे सर्वजण धोनीला "कॅप्टन कूल' म्हणायचे अन् आता एकदम "कॅप्टन फूल!' तुम्हाला करायची असेल तर खुशाल करा "एमआयडी'गिरी... गया तो गया इंडिया वापस!
एसीपी ः काहीही असो, क्राईम झालाय तर जुर्माना तर भरावाच लागेल... कॅप्टन म्हणून धोनीला... हाऽऽऽ हाऽऽऽ हाऽऽऽ
(औरंगाबाद "सकाळ'मध्ये प्रसिद्धी तारीख ः 16 मे 2010 )

Thursday, May 13, 2010
शोएब भाऊजींची कानपिळणी...
वेलकम बॅक टू मन का रेडिओ... 172.0 एफएमवर. सानिया मिर्झाच्या लग्नाच्या धक्क्यातून (तिच्या चाहत्यांसाठी धक्काच की!) सावरला असाल तर आता तुम्ही नॉर्मल झाले आहात असे समजून थोडे रिलॅक्स होत, आजचा "आँखो देखा हाल, कानों सुना हाल' वाचा. त्याचं काय आहे की, लग्न लागेपर्यंत "सानियाचे लग्न' हा एक राष्ट्रीय प्रश्न झाला होता. सानियाच्या टेनिस मॅचवर कधी सट्टा लागल्याच्या बातम्या आल्या नाहीत, पण लग्नावर मात्र सट्टा लागला. तिचा परफॉर्मन्स खराब झाला म्हणून कोणी चिंताग्रस्त झाल्याचे तुम्हाला आठवत नसेल, पण हे लग्न होते की, नाही यावरून मात्र अनेक जण चिंताग्रस्त झाले होते! अशा पार्श्वभूमीवर टीव्हीवाल्यांनी लग्न ते बिदाईपर्यंत सर्व सोपस्कार "एक्स्लुझिव्हली' दाखवून लोकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. हे टीव्हीवाले हनिमूनपर्यंत गेले नाहीत हेच नशीब म्हणावे लागेल! असो. तर अशा या कव्हरेजमधून एक गोष्ट सर्वांच्याच नजरेतून सुटली ती म्हणजे "शोएब भाऊजींची कानपिळणी'. ही कानपिळणी झाली होती, आणि तिचे कव्हरेज फक्त "मन का रेडिओ'कडेच आहे. या कानपिळणीचे वार्तांकन करण्यासाठी आमचे खास बातमीदार बंडू भांडाफोडकर घटनास्थळी गेले होते. वाचा त्यांचा हा वृत्तांत -
- सांगा, सांगा बंडू भांडाफोडकर, तुम्हाला आता सध्या काय दिसत आहे?
बंडू (नाकावर येणारा जाड भिंगाचा चष्मा सावरत) ः मी "मन का रेडिओ'साठी बंडू भांडाफोडकर थेट हैदराबादहून बोलतोय. आता सध्या नुकतेच लग्न लागून गेले आहे. पाहुणे मंडळी विविध पक्वानांवर ताव मारत आहे. इकडे लगोलग "शोएब भाऊजींची कानपिळणी' सुरू झाली आहे. देशभरातील सानियाच्या चाहत्यांच्या यादीतून मोजक्यांची निवड कानपिळणीसाठी ड्रॉद्वारे करण्यात आली होती. खरेतर सानियाच्या सर्वच चाहत्यांची लग्नाला उपस्थित राहण्याची इच्छा होती, पण तसे शक्य नसल्याने "कानपिळणी' च्या निमित्ताने मोजक्यांची निवड करण्यात आली होती. त्यात गजूभाऊ आणि इतरांचा समावेश होता. यानिमित्ताने का होईना आपल्यापासून सानियाला दूर नेणाऱ्या शोएबचे कान उपटता येतील, असा मनोमनी विचार करून गजूभाऊंनी या समारंभात भाग घेतला. आता मला स्पष्ट दिसत आहे की, गजूभाऊंनी शोएबभाऊजींचा कान हातात धरला आहे...आणि एकच मोठी किंकाळी... शोएब भाऊजींचा कान लालेलाल झाला आहे... पण सांगतो कुणाला? शेवटी गजूभाऊ म्हणजे सानियाचा चाहता! आता गजूभाऊंनी शोएबभाऊजींच्या डोक्यावर एक मोठ्ठा पापड ठेवून त्यावरही दणका मारला आहे. पाहता पाहता शोएबच्या डोळ्यांसमोर काजवे चमकत आहेत... एवढे होऊनही शोएब भाऊजींना प्रथेप्रमाणे गज्जूभाऊंचा यथोचित सत्कार करून त्यांना वाटी लावावे लागणार आहेच. शोएब भाऊजींनी हुकूम करताच त्यांच्या नोकराने दुबईच्या पेंडखजुरांचा बॉक्स प्रेझेंट म्हणून सादर केला आहे. त्याबरोबरच गज्जूभाऊंना अरबी ड्रेस (दुबईचे शेख, बुखातीर घालतात तसे), टॉवेल-टोपीही देण्यात आली आहे. हा ड्रेस दुबईतील स्टॅंडर्ड मापांनुसार तेथील दर्जीने शिवलेला असल्यामुळे त्यात तीन गज्जू भाऊ मावू शकतील, असा तो झाला आहे! याशिवाय गज्जूभाऊंसाठी दुबईचे विमानप्रवासाचे तिकीट आणि आमंत्रण असलेले पाकीटही प्रेझेंट देण्यात आले आहे. कानपिळणीत लालेलाल झालेला कान लक्षात घेता हे आमंत्रण देऊन शोएब भाऊजींनी "दुबईला ये, पाहून घेतो' असे संकेत दिल्याचे मानले जात आहे. पाकिटात परतीचे तिकीट नसल्याने शोएब भाऊजींनी परतीचे सर्व दरवाजे बंद केल्याचे मानले जात आहे. आता हे आमंत्रण गज्जू भाऊ स्वीकारतील का, "भाईं'च्या देशात जाऊन "भाऊ'गिरी करतील का, हाच प्रश्न आहे. बंडू भांडाफोडकर, "मन का रेडिओ'साठी... थेट हैदराबादहून...
(बंडू भांडाफोडकर याचा हा रिपोर्ट खराच आहे, असा आमचा दावा असला तरी शोएब-सानियाच्या लग्नात "कानपिळणी' कशी होणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. शिवाय बंडू भांडाफोडकर यांच्या चष्म्याचा नंबर कोणत्याही ऑप्टिकल वाल्याच्या रेंजच्या बाहेर गेलेला असल्यामुळे त्याने केलेले वार्तांकन सानियाच्याच लग्नाचे होते की, एखाद्या "सोनिया'च्या हे सांगता येणे अवघड आहे).
(प्रसिद्धी तारीख ः 18-4-10)

Wednesday, May 12, 2010
ले लो भई; पंजाब किंग्ज इलेव्हन ले लो...
वेलकम बॅक टू मन का रेडिओ, 172.0 एफएमवर आपले स्वागत आहे. ले लो भई पंजाब किंग्ज इलेव्हन ले लो,गरम मसालेदार टीम ले लो, घ्या हो घ्या, पंजाब किंग्ज इलेव्हन घ्या,गरम मसालेदार किंग्ज इलेव्हन घ्या..."मन का रेडिओ'च्या प्रातःकालीन सेवेत आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, पंजाब किंग्ज इलेव्हन संघ आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत फर्स्ट नंबरवर (खालून) असल्यामुळे त्याच्या अनेक मालकांपैकी काहींना हा संघ एकदाच फुकून (विकून) टाकावा, असे वाटू लागले आहे. मालकीनबाई प्रीती झिंटाचा मात्र याला विरोध असल्याचे कळले आहे. एकूणच या प्रकरणावर आधारित श्रुतिका सादर करीत आहोत... "किंग इज युवराज सिंग'...
(सकाळची झुंजुमुंजू वेळ... रेडिओवर "घनःश्याम सुंदरा' गाणे लागलेले... बाहेर गायी हंबरताहेत, कोंबडे कॉक् कॉक् करून बांग देताहेत. (कोंबडी पळाली गाण्यामुळे आजकाल कोंबड्या "कुकुचकू'ऐवजी कॉक् कॉक् करतात...). किंग्ज इलेव्हनचा कर्णधार माहेला जयवर्धने घाईघाईने युवराजसिंगच्या ड्रेसिंग रूममध्ये घुसतो... पुढे..)
माहेला ः यंड युवी यंड, दी एंड... उट उट (सिंहली भाषा... आपल्याला काय कळते त्यातले?)... कोण आलंय बघ साक्षात मालकीनबाई आल्यात. (युवराजसिंग नाव उठता उठत नाही)
मालकीनबाई ः महिला... महिला... उसको जल्दीसे उठाओ...
माहेला ः मॅडम, प्लीज मला "महिला... महिला' नका ना म्हणू! मी "माहेला' आहे..
मालकीनबाई ः ओके, ओके, नुसते शब्दांचा काथ्याकूट करण्यात पटाईत आहात. त्याऐवजी मॅचमध्ये बॉल कुटला असता तर निदान किंग्ज इलेव्हनची जी हालत झाली ती झाली नसती. प्रॅक्टिस करायची सोडून हा चक्क घोरत पडलाय. उठाओ इसको, वर्ना...
माहेला ः ओ, मॅडम या फिल्मी धमक्या कोणाला देताय? वर्ना बिर्ना कुछ नहीं. मी एकटा काय काय करणार? तुमचे हे दिवटे बघा कसा आराम फर्मावत आहेत. हा खेळणार आमोश्या-पौर्णिमेला... याला कोणी काही म्हणत नाही. आता उरलंच काय म्हणा यंदाच्या "आयपीएल'मध्ये!
मालकीनबाई ः इनफ इज इनफ... मी चांगल ट
ीमला वाचवायला निघाले अन् तुम्ही लोक मलाच टॉर्चर करता? 35 कोटीला घेतलेली टीम 25 मध्येच फुंकून टाका म्हणून सगळे मागे लागलेत. पण मी होते म्हणूनच टीम नाही विकली. नाही तर...
माहेला ः ः नाही तर... काय? कोण घेणार असल्या टीमला 25 कोटी देऊन? मी होतो म्हणून कॅप्टन झालो... थांबा, आज फैसला करूनच टाकूत... याला बादलीभर पाणी... नको... साध्या पाण्याने हा उठणार नाही. कोल्ड्रिंकच टाकूनच उठवतो याला. उलाला उले उलेलो... (एवढे म्हणताच इतका वेळ झोपेचे सोंग घेतलेला युवराज ताडकन् उठतो).
युवराज ः थांबा! खबरदार, गडबड करू नका. नाही तर असा स्ट्रेट ड्राईव्ह मारील की...
माहेला ः ः मालकीनबाईंना क्रिकेट कळत नाही म्हणून क्रिकेटच्या भाषेत बोलतोस काय? झोपलेल्याला उठवता येते; पण झोपी गेल्याचे सोंग करणाऱ्याला नाही, हेच खरं. एवढा कंटाळा आला तर जा ना तिकडे तेंडुलकरच्या टीममध्ये...
युवराज ः खामोश... किंग इज सिंग, किंग इज सिंग... सिंग वुईथ मी... आता आपल्याला "ले लो भाई किंग्ज इलेव्हन ले लो' म्हणून ऍड करावी लागेल नाही का मॅडम? ऍड म्हटले की पैसे आलेच. चला सुटलो बुवा! एकदाच हिशोब करून टाका आमचा अन् द्या मुक्ती. (माहेलाकडे पाहत) नाही तरी या "महिलांच्या' टीममध्ये खेळणे या युवराज "किंग'ला शोभत नाही.
(एवढे बोलून युवराज पळत सुटलाय... त्याच्यामागे माहेला अन् त्या मागे मालकीनबाई... युवी युवी करीत...)
(प्रसिद्धी तारीख ः 10-4-10)

Sunday, May 9, 2010
न झालेला धोंडा...
आला धोंड्याचा महिना,
सासरेबुवा झटपट कर्ज काढा,
मला पाहिजे सोन्याचा धोंडा...
वेलकम बॅक टू मन का रेडिओ... 172.0 एफएमवर आपले स्वागत आहे. तमाम जावईबापूंचा आवडता महिना अर्थात "धोंड्या'चा महिना आता शेवटाकडे झुकला आहे. या पार्श्वभूमीवर आमचे रिपोर्टर धोंडोपंत घिसाडघाईकर यांनी काही सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया रेकॉर्ड करून आणल्या आहेत. काय म्हणता, तुम्हालाही वाचायच्यात या प्रतिक्रिया...तर वाचा... आमचे काही ऑब्जेक्शन नाही. पढते रहो, मन का रेडिओ... पढते पढते...
अक्षय कुमार ः चलो बुलावा आया हैं, "काका'ने बुलाया हैं... जय माता दी... सभी बहेनो और भाईयोंको, मन का रेडिओ पढने वालों को मेरा नमश्कार. आय लाईक "धोंडा'. अरे बाबा मी महाराष्ट्रात राहतो, माझी रोजीरोटी इथे आहे, मग मला "मराठी' न यायला काय झाले? त्यामुळे मराठी कल्चरमधील "धोंड्या'चा महिना मला फारच आवडतो. ट्विंकलबरोबर लग्नाला इतके वर्षे झाली पण कधी सासरेबुवा "काकां'नी (अर्थात राजेश खन्ना) धोंड्याला बोलावले नाही, पण या वर्षी काय झाले काय माहित. फर्स्ट टाइम आमंत्रण आलेय. सासूबाई डिंपलजींनीही आग्रहाने बोलावलेय. जाना तो पडेगाईच. आखिर माझा हा पहिलाच धोंडा आहे.
धोंडोपंत घिसाडघाईकर (एक्स्पर्ट कमेंट) ः आपला आवडता अक्षय धोंड्यासाठी सासरी जाणार आहे. त्याच्यासारखा धोंडा गळ्यात पाडून घेतला, त्याला पैलू पाडले, त्याला सुपरस्टार केले अशी समजूत होऊन तर काकांनी त्याला बोलावले नाही ना? वाचू या दुसरी प्रतिक्रिया...
गुलशन ग्रोव्हर ः बॅड मॅन. मी हिरो लोकांच्या डोक्यात धोंडा घालणारा म्हणून फेमस, पण इथे तर लोक "धोंडा' खायला स्वतःहून जातआहेत. मला अजून सासरच्यांनी धोंडा खायला बोलावले नाही, याचे वाईट वाटते. वाटते एखाद्याच्या डोक्यातच "धोंडा' घालावा...
धोंडोपंत ः आता याला घरी बोलवून कोण पायावर धोंडा पाडून घेईल म्हणा, वाचा नेक्स्ट प्रतिक्रिया...
सलमान ः वॉव! आय लाईक धीस "धोंडा' कल्चर. आता वेळीच लग्न झाले असते तर आतापर्यंत दोन-तीन धोंडे तरी खाल्लेच असते, पण काही हरकत नाही. पुढच्या वेळेस तरी नक्कीच धोंडा खाईल... हंड्रेड पर्सेंट... ये मेरा वादा हैं... यहॉं भी होगा, वहॉं भी होगा... मेराही धोंडा...
सचिन तेंडुलकर ः वेल... बाईज प्लेड वेल, पण ऐन धोंड्याच्या महिन्यात ट्वेंटी-ट्वेंटी वर्ल्डकप खेळावा लागतोय म्हणून इंडियन टीम ऑस्ट्रलियाविरुद्ध इतकी वाईट खेळली. इथून पुढे आयसीसीने वर्ल्डकपचे नियोजन करताना "धोंड्या'च्या महिन्याची दखल घ्यावी. किमान आता तरी आयसीसीने भारतीय टीमला वेस्ट इंडिजमध्ये "धोंडा' करावा.
धोंडोपंत ः सचिनने तमाम जावई खेळाडूंची कैफियत मांडल्याबद्दल त्याचे अभिनंदन. पण आम्ही तर त्याच्या वैयक्तिक धोंड्याविषयी विचारले होते? असो. वाचूया शेवटची प्रतिक्रिया...
रणबीर कपूर ः काय... धोंडा... आश्चर्य वाटले ना! माझे लग्न पण झाले नाही अन् मला धोंड्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी येथे बोलावलेय. पण काय करणार? मिडियाला सांभाळावे लागते बाबा. हा "मन का रेडिओ'चा रिपोर्टर... क्या नाम बताया उसने... हां... धोंडोपंत... उसका जरा स्क्रू ढिला दिखता हैं... जरा फिट कर के आता हूँ...
(यानंतर धोंडोपंत कॅसेट घेऊन आले ते थेट "मन का रेडिओ'च्या स्टुडिओत आणि तीच तुम्ही ऐकली. पण एकूणच मामला गंभीर आहे. या प्रतिक्रियांचं काही खरं दिसत नाही. आम्ही या प्रतिक्रिया प्रसिद्ध केल्या नाहीत आणि तुम्ही त्या वाचल्या नाहीत. ओके...)
("सकाळ'मध्ये प्रसिद्धी तारीख ः 9 मे 2010)

Friday, May 7, 2010
लाच देणे-घेणे ः एक नैसर्गिक प्रवृत्ती!
लाचखोरी... खोरी टेबलाखाली,
लाचखोर निघाले...
बिनधास्त निघाले...
चारी धामी...
लाचखोरी... खोरी टेबलाखाली...
-------------
वेलकम बॅक टू मन का रेडिओ 172.0 एफएमवर आपले स्वागत करीत आहे. आता तुम्हाला हा "मन के रेडिओ' वाचण्यासाठी कोणत्याही प्रकारची लाच किंवा हिंदीत ज्याला "घूँस' म्हणतात तशी द्यावी लागत नाही, हे फारच चांगले आहे. तुम्ही आपले सवय लागली म्हणून फ्रीमध्ये वाचता. तर मुद्दा काय की, जगात आता बुहुतेक क्षेत्रे भ्रष्टाचाराने व्यापलेली आहेत आणि त्यातील महत्त्वाचा घटक म्हणजे "लाच'! मागील काही दिवसांत आपण भारतीयांनी लाच देण्या-घेण्याचे बहुतेक सर्व विक्रम मोडीत काढले असावेत. दोन कोटी काय, काही लाख काय... काही विचारू नका. या पार्श्वभूमीवर नेमकी समस्या काय, हे जाणून घेण्यासाठी "मन का रेडिओ'तर्फे "लाचखोरी ः एक मानवी नैसर्गिक प्रवृत्ती ः एक चिकित्सक अभ्यास' या विषयावर डॉक्टरेट मिळविणारे डॉ. लाचपती यांचा भांडाफोड करणार आहेत, अर्थात मुलाखत घेणार आहेत, बंडू भांडाफोडकर...
ंबंडू (जाड भिंगाचा चष्मा सावरत) ः "मन का रेडिओ'मध्ये आपले स्वागत आहे डॉक्टर. डॉक्टरेट मिळविल्याबद्दल तुमचे स्वागत. तुमच्या पीएच.डी.चा विषय पाहता सर्वप्रथम हे डिक्लेअर करा की, तुम्ही ही पीएच.डी. मिळविण्यासाठी किती जणांना आणि किती लाच दिली होती?
डॉ. लाचपती ः वेल इट इज क्वाईट डिफिकल टू रिमेंबर अँड टेल... बट आजचा आपला विषय "लाचखोरी ः एक मानवी नैसर्गिक प्रवृत्ती ः एक चिकित्सक अभ्यास' यावर चर्चा असा आहे. तर त्याचं काय आहे की, आधी या विषयाबद्दल सांगतो. लाच देणे-घेणे ही एक नैसर्गिक मानवी प्रवृत्ती आहे. अगदी लहान कारट्याने भोकाड पसरले की, आपण नाही का त्याला चॉकलेट देऊन गप्प करतो; तसेच हे साधेसरळ सोप्पे आहे. माझे तर म्हणणे आहे की, आपला देश जर "लाच फ्री' राहिला असता तर आपली एवढी प्रगती कधीच झाली नसती! देशात महागाई किती वाढली आहे बघा, प्रत्येकाला वाटते आपल्याला उत्पन्नाचा एक्स्ट्रा "सोर्स' असावा आणि या सोसातूनच लाचेचा सोर्स निर्माण होतो आणि...
(सोर्स... सोस... सर्व डोक्यावरून गेल्याने बंडूने मध्येच प्रश्न विचारला)
बंडू ः डॉक्टर डॉक्टर... तुम्हीसुद्धा... खरोखरची पीएच.डी. मिळविलेल्या माणसासारखे डोक्याच्या दोन हात वरून जाणारे बोलू लागला आहात. मला एकच सांगा तुम्ही ही पीएच.डी. मिळविण्यासाठी किती जणांना आणि किती लाच दिली होती?
डॉ. लाचपती ः वेल इट इज क्वाईट डिफिकल टू रिमेंबर अँड टेल... बट तुम्ही आपल्या देशातील "गरीब' बिचाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा विचारच केला नाही. मान्य आहे त्यांना गलेलठ्ठ पगार असतो, डोक्यावर पंखा किंवा एसी असतो, पेन्शन मिळणार असते, कोणकोणते भत्ते असतात, काम कमी अन् सुट्या जास्त असतात; पण तरीही महागाई किती वाढलीय याचा विचार कोणीच करीत नाही. आता लिव्हिंग स्टॅंडर्ड जपायचे असेल तर लाच घ्यावीच लागते. बरं, लोकांना वेळ कुठं आहे काही नियमानुसार, कायद्यानुसार करायला? ते आपले पैशांचे "पुट्टल' घेऊन तयारच असतात, झटपट काम करून द्या म्हणून. एकदा का पुट्टल मिळाले, की कामे कशी झटपट होतात हे सर्वांनाच माहिती आहे. कामे लवकर झाली, की देशाची प्रगती होते हे काय सांगायला हवे? आता लाच घेताना घ्यावयाची काळजी मी माझ्या प्रबंधात स्पष्ट केली आहे. लाच एकट्याने खाऊ नये. एक तीळ जसा सात जणांनी वाटून खाल्ला तशी लाच खावी, म्हणजे ती व्यवस्थित पचते. तिचा बोभाटा होत नाही. आता पकडले गेलेले सर्व "सन्मानिय' हे हा नियम न पाळल्यानेच पकडले गेले; पण "डोंट वरी' दोन कोटी खाताना पकडले तर काही फरक पडत नाही, बाहेर पडण्यासाठी पुन्हा तोच फॉर्म्युला आहेच की, लाच देण्याचा! एकूणच काय स्टॅंडर्ड मात्र वाढले पाहिजे. लोकांनी दोन-अडीच हजारांची लाच घेऊन लाचखोरांच्या जमातीला बट्टा लावण्याचा प्रयत्न करू नये... हाचा माझ्या प्रबंधाचा निष्कर्ष आहे. "स्वेच्छा लाचेला'... म्हणजे स्वतःहून लाच देण्यास जर एखादी व्यक्ती तयार असेल तर... त्याला कायदेशीर मान्यता मिळावी, असे मला वाटते.
बंडू ः ते जाऊ द्या हो, तुम्ही फायनल एकदाच सांगा की, तुम्ही ही पीएच.डी. मिळविण्यासाठी किती जणांना आणि किती लाच दिली होती?
डॉ. लाचपती (चिडून) ः सारखं सारखं तेच तेच काय विचारताय? आता सांगू का इथे मुलाखत देण्यासाठी मला तुम्ही किती लाच दिली होती ते!
("सकाळ'मध्ये प्रसिद्धी तारीख ः 2 मे 2010)

Subscribe to:
Posts (Atom)