Tuesday, May 25, 2010

लग्न सानियाचे...

सासरला ही सानिया निघाली

भारतीयांची लाडी,

नेसली दुबईची साडी...


अरे...रे...रे... चक चक, हुंदकेच हुंदके... "वेलकम बॅक टू मन का रेडिओ.' अशा या हुंदकाळलेल्या वातावरणात वरचे रिमिक्‍स गाणे वाचून तुमचे मन आधीच भारी झाली असेल तर आजचा "मन का रेडिओ' वाचताना पार दुःखाच्या सागरतळाला जाण्याची तयारी ठेवा. हा इशारा नव्हे, "वॉर्निंग' आहे. मन घट्ट केले असेल तरच वाचा... नाही तर सोडून द्या... कधी नव्हे ते आम्हा भारतीयांना "क्रिकेट' सोडून दुसरा कोणता विदेशी गेम कळला असेल तर तो म्हणजे "टेनिस' अन्‌ तोही कोणामुळे कळला असेल तर ती म्हणजे सानिया मिर्झा. "गेम', "सेट' "मॅच पॉइंट', "लव्ह ऑल' इ. इ. शब्द कळले ते सानियामुळेच. अशी ही सानिया हैदराबादी सोहराबशी लग्न करणार हे मागे कळाले तेव्हाच अनेक नवतरुणांचा हार्टफेल व्हायचे शिल्लक राहिले होते. तो धक्का कसाबसा सहन करून, चला जाऊ द्या सानिया हैदराबादेत का होईना, सोहराबची का होईना भारतात आहे ना, अशी आपल्या मनाची समजूत घालून तिचे चाहते कसेबसे दिवस काढीत होते. पण आता... चक्क पाकिस्तानी क्रिकेटपटूशी (नाव कशाला घ्यायचे?) लग्न करून दुबईवासी होणार हे कळल्यापासून तिचे अनेक चाहते तर नुसतेच नावाला जिवंत आहेत, असे आमच्या दृष्टोत्पत्तीस म्हणजेच नजरेस पडले आहे. आता या गंभीर प्रसंगावर वाचा तिच्या चाहत्यांच्या खालील प्रतिक्रिया ः



चाहता नं. 1 (गाण्यानेच सुरवात करीत) ः परदेसी, परदेसी जाना नहीं, हमें छोड के, हमें छोड के! काय बोलू शब्दच फुटत नाहीय. आता आम्ही काय त्या धस्कट पेस आणि भूपतीचा खेळ पाहायचा की काय? आता "टेनिस'मध्ये काही राम उरला नाही. भारतीय टेनिसविश्‍वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सानियाच्या सासरच्यांना टेनिस आवडत नाही म्हणे! म्हणजे बोंबला, आता ते तिला काय खेळू देणार? हा म्हणजे हातानेच पायावर "रॅकेट' मारून घेतली, असा प्रकार झाला आहे.



चाहता नं. 2 (गाण्यानेच सुरवात करीत) ः बाबूल की दुआएँ लेती जा, जा तुझको सुखी संसार मिलें... जे झाले ते झाले. कोणाशी लग्न करायचा हा तिचा पर्सनल प्रश्‍न आहे. उगाच तिच्या पर्सनल लाईफमध्ये लुडबूड करणारे आपण कोण? अहो, हे लग्न साधेसुधे नाही. इंटरनॅशनल लग्न आहे इंटरनॅशनल! त्यामुळे दोन्ही हाडवैरी देश जवळ येतील. सब तरफ होगी, शांती चारो ओर... एक दिन... खरं म्हणजे एखादा शांततेचा पुरस्कार स्थापन करून आपणच तो सानियाला द्यायला हवा, "नोबेल' मिळेल तेव्हा मिळेल.

चाहता नं. 3 ः का? पण का? असे का केले सानियाने? व्हाय? व्हाय नॉट शादी इन इंडिया... मेड इन इंडिया ना? मग पाकिस्तानचे एवढे प्रेमाचे भरते का? आखीर क्‍यूँ... (या चाहत्याची क, का, की, की ची बाराखडी काही संपत नाहीय, नेक्‍स्ट्‌...)

चाहता नं. 4 (गाण्यानेच सुरवात करीत, गाण्यावरून बरेच वयस्कर दिसतात) ः "जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी राहा....' मुली... मुली... (स्वर कातर झालेला) आमच्यासारख्या तमाम ज्येष्ठ नागरिकांकडून तुला लग्नाच्या शुभेच्छा बरं का! हॅप्पी मॅरेज इन ऍडव्हान्स. आमची दृष्टी अधू झाली, ऐकायला व्यवस्थित येत नाही तरी बरं का चाहते म्हणून आम्ही तुझी एकही मॅच टीव्हीवर पाहायला चुकविली नाही बरं का! लग्न म्हणजे आपल्या हातात असते काय? त्या प्रारब्धाच्या गोष्टी. तुझा "टायअप' पाकिस्तानी क्रिकेटपटूशीच असेल तर तू तरी त्याला काय करणार? डरने का नहीं, रुकने का नहीं, लाईफ में चलते रहनें का, फिर टेंशन काय को लेने का?

मंडळी, "मन का रेडिओ'कडे "लग्न सानियाचे' या विषयावर प्रतिक्रिया देण्यासाठी स्टुडिओबाहेर रीघ लागली आहे. ती कंट्रोलला येईल असे दिसत नाही. तेव्हा घेऊया एका आठवड्याची विश्रांती, पुन्हा भेटूया...याच अंकात... याच दिवशी... पण जागा मिळेल तिथे.......!

1 comment:

  1. wah chan aahe. pradip bhagwat maze awadte lekhak ahet.

    ReplyDelete

वाचून काय वाटले? मनात ठेवू नका... लगेच प्रतिक्रिया देऊन टाका...