वेलकम बॅक टू मन का रेडिओ... 172.0 एफएमवर आपले स्वागत आहे. जगातील लेटेस्ट आणि सर्वाधिक क्रांतिकारी घटना नुकतीच घडली आहे, ती सुद्धा भारतात नव्हे नव्हे महाराष्ट्रात... नव्हे मराठवाड्यात... चक्क उमरगा तालुक्यात गुंजोटी येथे! तेथील विद्यार्थ्यांनी त्यांच्याविरुद्ध होणाऱ्या "अन्याया'विरुद्ध बापूंच्या अहिंसात्मक आंदोलनाला साजेसा उपक्रम अर्थात ठिय्या देऊन आवाज उठविला. सगळीकडे सर्रास कॉप्या सुरू असताना आम्हाला कॉपी करू देत नाहीत, म्हणजे काय? असे म्हणत विद्यार्थ्यांनी चक्क परीक्षा केंद्रात जाण्यास नकार दिला. तब्बल अर्धा तास निषेध नोंदवून मग विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. असा हा जागतिक ऐतिहासिक लढा महाराष्ट्रात झाला. यावर बापूंचे भक्त मुन्नाभाईंना (एमबीबीएस) मनोगत व्यक्त करण्याचा, थेट बापूंशी संवाद साधण्याचा मोह अनावर झाला नाही, तरच नवल. आणि त्याला "मन का रेडिओ' सारखे व्यासपीठ कोठे मिळणार... तर वाचूया या विषयावर मुन्नाभाई एमबीबीएसचे मनोगत, थेट बापूंशी संवाद...ऑन एअर...
मुन्नाभाई ः प्रणाम बापू... क्या सब ठिकठाक हैं ना... मुन्नाभाई एमबीबीएस पिक्चरके बाद पहिलीच बार रेडिओ पे बोल रहा हूं. गुंजउठी (गुंजोटी) गॉंव के बच्चे लोगों नें आपके स्टाईल से आंदोलन किया. मेरा तो भेजाच नहीं चलरेला हैं. सर्किटका तो पुरा सर्किटीच डॅमेज हो गया हैं. आजकल के बच्चे लोगों को क्या हो गया... कुछ समज नहीं आता. क्या बोलते मालूम उधर कॉपी चलरेली तो इधर क्यूं नहीं. आता बापू सवाल एकदम सहीं है पर कल ये बोलेंगे वो चोरी कर रहां है, तो मैं क्यूं न करूं! आता हे बरोबर आहे का, तुमीच बोलो! अब सर्किट और मैने पिक्चरमें किया वो एकदम गलत था, सब रॉंग था. अब ये बच्चे लोंगों का सिक्रेट मेरे को मालूम. सालभर ये घूमेंगे, फिरेंगे, ऐश करेंगे और क्या! पेपर जवळ आला की, मग पुस्तक घेऊन बसणार. पुस्तकातलं भेजात घुसलं नाही तर पुस्तकाचे पोस्टमार्टेम करून कॉप्या करणार. वर कॉपी नाही करून दिली तर ठिय्या देणार. वा रे वा... मैं क्या बोलता ऐसे बच्चों को करने दो ना कॉपी. उनके सामने रख दो किताब... लेकिन स्टडीच नहीं किया तो ऍन्सर कहॉं से मिलेगा! ढूँढते रहे जाएंगे... टाईम खतम और फिर फेल! अगर कॉपी करके पास भी हुए तो "इडियटी'च रहेंगे ना. उनका तो "ऑल इज वेल' होनेवालाच नहीं. बापू... तुमीच समझाओं ना इनको. मेरा तो भेजाफ्राय होगया... सर्किट किधर हैं तू... गाडी निकाल रे बाबा...
("सकाळ'मध्ये प्रसिद्धी तारीख ः 21 मार्च, 2010)
No comments:
Post a Comment
वाचून काय वाटले? मनात ठेवू नका... लगेच प्रतिक्रिया देऊन टाका...